राहुल गांधी, मुलायम सिंह ते शत्रुघ्न सिन्हा...या नेत्यांनी कोणाकडून घेतलेत पैसे उधार?

राहुल गांधी, मुलायम सिंह ते शत्रुघ्न सिन्हा...या नेत्यांनी कोणाकडून घेतलेत पैसे उधार?

मोठमोठे नेते मंडळी पैशांची गरज असेल तर पैसे उधार घेत असतात.

  • Share this:

मुंबई, 06 मे : सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे. निवडणुकीला उभे असलेले उमेदवार आपली संपत्ती जाहीर करतात. अशा वेळी एक गोष्ट लक्षात आली. ती वाचून तुम्हाला धक्काच बसेल. मोठमोठे नेता पैशांची गरज असेल तर बँकांकडून नाही तर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींकडून पैसे उधार घेतात.

या यादीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, भाजप नेता गिरीराज सिंह आणि शत्रुघ्न सिन्हाही आहेत.

राहुल गांधींनी आईकडून घेतलंय 5 लाखांचं पर्सनल लोन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याकडून 5 लाख रुपयांचं पर्सनल लोन घेतलंय. त्यांच्यावर अजून कुठलं कर्ज नाही. रायबरेलीतून निवडणूक लढवणाऱ्या सोनिया गांधींनी सांगितलं की त्यांच्यावर कुठलं कर्ज नाही.

L&T या कंपनीत नोकरीची मोठी संधी, या वर्षी करणार 'इतक्या' नियुक्त्या

पुत्र अखिलेशचे कर्जदार आहेत मुलायम

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीहून निवडणूक लढवणारे मुलायम सिंह यादव यांनी सांगितलं की त्यांच्यावर मुलगा आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून घेतलेलं 2.13 कोटींचं कर्ज आहे. त्यांनी त्यांची दुसरी पत्नी साधना यादव यांना 6. 75 लाख रुपयांचं कर्ज दिलंय.. तसंच 43.7 लाख रुपये मुलगा प्रतिक आणि 9.8 लाख रुपये कुटुंबातली एक सदस्य मृदुला यादव यांना दिलेत.

Maruti ची बेस्ट ऑफर, 'या' 5 कार्सवर मिळतंय 45 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

शत्रुघ्न सिन्हांनी सोनाक्षी सिन्हाकडून घेतले 10 कोटी रुपये

पक्ष बदललेले शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली लेक सोनाक्षी सिन्हाकडून 10.6 कोटींचं कर्ज घेतलंय. त्यांनी आपला मुलगा लवला 10 लाख रुपये आणि पत्नी पूनम सिन्हा यांना 80 लाख रुपये कर्ज दिलेत. पूनम सिन्हा लखनऊवरून निवडणूक लढवतायत. त्यांनीही सोनाक्षीकडून 16 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय.

बँकेत जायचा वेळ वाचवा, ATMमधून करू शकता ही 8 महत्त्वाची कामं

मीसा भारतींचे पती आहेत कर्जदार

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती पाटलीपुत्रहून निवडणूक लढतायत. त्यांनी कर्ज घेतलेलं नाही. पण त्यांचे पती शैलेश कुमार यांनी ICICI बँकेकडून 9.85 लाख रुपयांचं पर्सनल लोन घेतलंय.मीसानं 28 लाख रुपये आणि त्यांच्या पतीनं 2.9 कोटी रुपये उधार दिलेत. पण कोणाला दिले ते सांगितलं नाहीय.

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल'च्या कार्यकर्त्यांचा भाजप उमेदवारावर हल्ला

First published: May 6, 2019, 4:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading