PM मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत... कुणी कुठे गुंतवलेत पैसे?

PM मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत... कुणी कुठे गुंतवलेत पैसे?

या नेत्यांनी फिक्स्ड डिपाॅझिट आणि टॅक्स फ्री बाॅण्ड्सशिवाय म्युच्युअल फंड आणि शेअर्स यातही पैसे गुंतवले आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे. निवडणुकीआधी सर्व नेत्यांना आपली कमाई उघड करावी लागते. देशातल्या अनेक नेत्यांनी आपली  कमाई उघड केलीय. अनेक ठिकाणी गुंतवलेले पैसे त्यांनी दाखवलेत. या नेत्यांनी फिक्स्ड डिपाॅझिट आणि टॅक्स फ्री बाॅण्ड्सशिवाय म्युच्युअल फंड आणि शेअर्स यातही पैसे गुंतवले आहेत. अनेक नेत्यांकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ( RIL )चे शेअर्स आहेत. तर काही नेत्यांकडे बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे शेअर्स आहेत.

नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही. त्यांनी फक्त बँक, टॅक्स फ्री बाँडस्, इन्शुरन्स पाॅलिसी आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट इथे पैसे गुंतवलेत.

अमित शहा : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्या कंपनींचे शेअर्स खरेदी केलेत त्यात आहेत आरआयएल, टीसीएस, बजाज आॅटो, कोलगेट पामोलिव्ह, एचयुएल, एलएनटी फायनान्स, अल्ट्राटेक सीमेंट यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत.

राहुल गांधी : यांनी इक्विटीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीय. केरळमधील वायनाड लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपली कमाई उघड केली. त्यात असं आढळून आलं की ही गुंतवणूक म्युच्युअल फंडातून इक्विटीत केलीय.

सुप्रिया सुळे : दिग्गज नेता शरद पवार यांची मुलगी, एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे यांनी लिस्टेड नसलेल्या कंपन्यांमध्ये एक कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केलेत. तर त्यांच्याकडे लिस्टेड कंपन्यांचे सहा कोटी शेअर्स आहेत. त्यांनी म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवलेत.

नितीन गडकरी : केंद्रीय मंत्री आणि नागपूरहून उभे असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांनी पूर्ती पाॅवर शुगर लिमिटेडचे शेअर्स खरेदी केलेत. शिवाय त्यांनी इन्स्ट्रुमेंट्समध्येही गुंतवणूक केलीय.

पूनम महाजन : यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, व्होडाफोन आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स पाॅवर याशिवाय बंद पडलेली किंगफिशर एअरलाइन्स यांचेही शेअर्स घेतलेत.

प्रिया दत्त : काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलियो स्किममध्ये एकूण 14.92 कोटी रुपये गुंतवणूक केलीय.

मुरली देवरा : दक्षिण मुंबईतले काँग्रेस उमेदवार मुरली देवरांनी अनेक बाॅण्ड्स, पीएमएस अकाऊंट, स्ट्रक्चर्ड मार्केट प्राॅडक्टस म्युच्युअल फंड, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्समध्ये गुंतवणूक केलीय.

उर्मिला मातोंडकर : अभिनयातून राजकारणात प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून काँग्रेस उमेदवारी घेतलीय. त्यांनी शेअर्स, बाॅण्ड्स आणि म्युच्युअल फंडस् यात 28.28 कोटी रुपये गुंतवलेत. शिवाय पोर्टफोलियो मॅनेजमेंट सर्विसमध्ये जवळजवळ सहा कोटींची गुंतवणूक केलीय.

जया प्रदा :उत्तर प्रदेशातून रामपूर इथून उभ्या असलेल्या भाजप उमेदवार जया प्रदा यांनी एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, आयटीसी, एमसीएक्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक केलीय.

राज बब्बर : फरेहपूर सिक्री इथून उभे असलेले काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांनी आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलीय.

व्ही. के. सिंह : केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि त्यांची पत्नी यांनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलीय.

VIDEO: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी बजावला मतदानाचा हक्क

First published: April 29, 2019, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading