Home /News /money /

निवृत्ती वेतनधारकांना खुशखबर! पंजाब नॅशनल बँकेत Video Call द्वारे Life Certificate जमा करता येणार, कशी आहे प्रोसेस?

निवृत्ती वेतनधारकांना खुशखबर! पंजाब नॅशनल बँकेत Video Call द्वारे Life Certificate जमा करता येणार, कशी आहे प्रोसेस?

केंद्रीय पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. निवृत्ती वेतन विभागाने जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख दुसऱ्यांदा वाढवली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 जानेवारी : सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) पेन्शनधारकांना (Pensioners) जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन सन्मान पत्र (Life Crtificate) सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉल (Life Certificate submission on vidoe call) सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना महामारीच्या काळात जीवन प्रमाणपत्रे सादर करणे नेहमीपेक्षा सोपे होईल. PNB च्या नवीन व्हिडीओ बेस्ड कस्टमर आयडेन्टिफिकेशन प्रक्रियेअंतर्गत, पेन्शनधारकांना घरी बसून सुरक्षितपणे जीवन प्रमाणपत्रे सादर करता येतील. पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट केले की, जीवन प्रमाणपत्र सादर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. तुम्ही तुमची कागदपत्रे व्हिडीओ कॉलद्वारे सबमिट करू शकता. 28 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे. अर्ज भरण्याची तारीख दुसऱ्यांदा वाढवली कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या देखरेखीखाली निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अलीकडेच सर्व वयोगटातील केंद्रीय पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. निवृत्ती वेतन विभागाने जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख दुसऱ्यांदा वाढवली आहे. तुमच्याकडे पॅनकार्ड असल्यास वाचवू शकता 1000 रुपये, फक्त एक काम करावं लागेल? जमा केले नाही तरी पेन्शन मिळेल साधारणपणे, दरवर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र बँक किंवा पेन्शन एजन्सीकडे जमा करावे लागते. कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ही मुदत 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच 31 डिसेंबरची मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2022 करण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्याने कोणाचेही पेन्शन थांबणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. Multibagger Stock : एक लाखाचे 50 लाख फक्त दोन वर्षात, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक व्हिडिओ कॉलद्वारे कागदपत्रे जमा करता येतील >> PNB वेबसाइट https://www.pnbindia.in/ वर जा आणि लाइफ सर्टिफिकेट पर्याय निवडा. >> येथे तुमचा खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP टाका. >> तुमचा आधार क्रमांक टाका आणि पुढे जाण्यासाठी अटी व शर्ती स्वीकारा. >> आधार वेरिफिकेशनसाठी OTP टाका. >> तुमचा पेन्शन प्रकार निवडा. तुम्ही नियमित पेन्शन निवडल्यास व्हिडीओ लाइफ सर्टिफिकेटसाठी 'Submit Request' वर क्लिक करा. >> फॅमिली पेन्शनसाठी तुमचा रोजगार आणि वैवाहिक स्थिती तपशील एंटर करा आणि व्हिडीओ जीवन प्रमाणपत्रासाठी 'Submit Request' वर क्लिक करा. >> यानंतर जीवन प्रमाणपत्रासाठी तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट केली जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Pension, Pnb

    पुढील बातम्या