News18 Lokmat

PNB मध्ये 3 बँकांचं होणार विलीनीकरण, तुमच्यावर होतील 'हे' परिणाम

बँक ग्राहकांना योग्य वेळ देईल आणि खातेधारकांना मदत करेल.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 07:20 PM IST

PNB मध्ये 3 बँकांचं होणार विलीनीकरण, तुमच्यावर होतील 'हे' परिणाम

मुंबई, 21 मे : देशाची तिसरी मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB ) . या बँकेत लवकरच तीन छोट्या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. या बँका आहेत ओरियंटल बँक आॅफ काॅमर्स ( OBC ), आंध्र बँक ( Andhra Bank ) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank ) यांचा समावेश आहे.

या आधी बँक आॅफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँक यांचं विलीनीकरण झालं होतं. विजया बँक आणि देना बँकच्या विलीनीकरणानंतर बँक आॅफ बडोदा देशातली सर्वात मोठी सरकारी बँक बनली.

निवडणुकीच्या निकालानंतर कार-बाइक चालवणं होणार महाग, जाणून घ्या कारणं

ग्राहकांवर होणार 'हा' परिणाम

अलाहाबाद बँक, OBC आणि आंध्र बँक यांचं PNB मध्ये विलीनीकरण झाल्यावर खातेधारकांवर लगेच परिणाम होणार नाही. बँक जे काही निर्णय घेईल ते ग्राहकांना सांगितले जातील. अर्थात, ग्राहकांना नवं चेकबुक, पासबुक तयार करावं लागेल. बँक ग्राहकांना योग्य वेळ देईल आणि खातेधारकांना मदत करेल.

Loading...

RBI चलनात आणणार 10 रुपयांची नवी नोट, काय असेल खासीयत?

एटीएम आणि पासबुक होईल अपडेट

बँकेच्या ग्राहकांना कागदोपत्रांचं काम करावं लागेल. केवायसी पण करावी लागेल. एटीएम, पासबुक नव्या पद्धतीनं अपडेट होतील. त्यावर थोडं काम करावं लागेल. त्याला थोडा वेळ लागेल.

World Cup : इंग्लंडची हवा भारतासाठी धोक्याची, हे 5 खेळाडू ठरणार डोकेदुखी!

तुमच्या कर्जावर पहिल्यासारखा असेल व्याजदर

बँकांच्या विलीनीकरणानंतर तुमच्या कर्जावर काही परिणाम होणार नाही. तुम्ही अगोदर देता तेवढंच व्याज द्यावं लागेल. कुठलीही बँक दुसऱ्या बँकेत विलीनीकरण झाली तरी पहिलाच व्याजदर राहतो.


अमित शहांच्या 'शाही डिनर'मध्ये तब्बल 35 वेगवेगळे पदार्थ, कोणते? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: pnb
First Published: May 21, 2019 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...