नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: देशातील दुसरी मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 डिसेंबर पासून एटीएम (ATM) मधून पैसे काढण्याच्या नियमात काही बदल करत आहे. PNB ग्राहकांना चांगली बँक फॅसिलिटी (Bank Facility) देण्यासाठी आणि फ्रॉड एटीएम ट्रांझाक्शन (Fraud ATM Transaction) पासून वाचण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बँक वन टाइम पासवर्ड आधारित कॅश विड्रॉल प्रणाली सुरू करणार आहे. 1 डिसेंबरपासून ही नवी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याकरता तुम्हाला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागेल. हा नियम 10 हजारांहून जास्त रक्कम काढण्यासाठी लागू होणार आहे. बँकेने याबाबत माहिती दिली आहे.
PNB ने एक ट्वीट केले आहे, त्यानुसार- 1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत PNB 2.0 ATM मधून एकाच वेळी 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढण्याची प्रक्रिया ओटीपी बेस्ड असेल. अर्थात नाइट आवर्समध्ये 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर PNB ग्राहकाना OTP आवश्यक असेल. त्यामुळे या वेळेत ATM मध्ये जाताना तुमचा मोबाइल बरोबर घेऊनच जा.
Save the dates! PNB 2.0 is launching OTP based cash withdrawals from 1st December 2020. Making withdrawals easy, banking easier. pic.twitter.com/EsuXJvSTM3
— Punjab National Bank (@pnbindia) November 26, 2020
वाचा काय आहे PNB 2.0?
पंजाब नॅशनल बँकेमध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे. यानंतर जी एंटिटी अस्तित्वात आली आहे, तिला PNB 2.0 असे नाव देण्यात आले आहे. बँकेने ट्वीट केलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट केले आहे की, ओटीपी बेस्ड कॅश विड्रॉल PNB 2.0 ATM मध्येच लागू होईल. अर्थात ही सुविधा तुमच्या PNB डेबिट/ATM कार्डमधून अन्य कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास लागू होणार नाही.
कशी काम करेल ही प्रणाली?
-PNB एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल.
- हा OTP केवळ एकाच transaction साठी लागू होईल.
- या नवीन प्रणालीमधून पैसे काढण्यामुळे सध्याच्या कोणत्याही प्रक्रियेवर परिणाम होणार नाही.
- बँकेचे असे म्हणणे आहे की, यामुळे बनावट कार्डमुळे होणारे अवैध व्यवहार रोखले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money