मराठी बातम्या /बातम्या /मनी /पंजाब नॅशनल बँकेची ग्राहकांची चिंता वाढवली; एका निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार

पंजाब नॅशनल बँकेची ग्राहकांची चिंता वाढवली; एका निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढणार

PNB Interest Rates: 1 जुलै 2022 रोजी पीएनबीने कर्जदरात 15 बेसिस पॉईंट्स वाढ जाहीर केली होती. मात्र बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.40 टक्क्यांवर ठेवण्यात

PNB Interest Rates: 1 जुलै 2022 रोजी पीएनबीने कर्जदरात 15 बेसिस पॉईंट्स वाढ जाहीर केली होती. मात्र बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.40 टक्क्यांवर ठेवण्यात

PNB Interest Rates: 1 जुलै 2022 रोजी पीएनबीने कर्जदरात 15 बेसिस पॉईंट्स वाढ जाहीर केली होती. मात्र बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.40 टक्क्यांवर ठेवण्यात

मुंबई, 1 ऑगस्ट : महागाईने आधीच त्रस्त नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. कारण पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने आज 1 ऑगस्ट 2022 पासून मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) 10 बेस पॉइंट्सने वाढवला ​​आहे. या वाढीनंतर कर्ज घेणे महाग होईल आणि ईएमआयचे दर पूर्वीपेक्षा जास्त वाढतील.

नवीन दर काय आहेत?

PNB ने आजपासून एका वर्षासाठी MCLR 7.55 टक्क्यांवरून 7.65 टक्के केला आहे. एक दिवस, एक-महिना आणि तीन महिन्यांचा MCLR अनुक्रमे 10 बेसिस पॉईंट्सने 7.05 टक्के, 7.05 टक्के आणि 7.15 टक्के करण्यात आला आहे. पीएनबीचा सहा महिन्यांचा आणि तीन वर्षांचा एमसीएलआर अनुक्रमे 7.35 टक्के आणि 7.95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

डेबिड-क्रेडिट कार्डवर CVV नंबर कशासाठी असतो? याचं काम काय असतं?

यापूर्वीही दर वाढवण्यात आले होते

1 जुलै 2022 रोजी पीएनबीने कर्जदरात 15 बेसिस पॉईंट्स वाढ जाहीर केली होती. मात्र बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.40 टक्क्यांवर ठेवण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या आठवड्याच्या शेवटी आपले आर्थिक धोरण जाहीर करेल. महागाईचा सामना करण्यासाठी आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

Changes from 1 August : आजपासून कोणते नियम बदलणार? तुमच्यावर काय परिणाम होईल? चेक करा

एचडीएफसीने देखील दर वाढवलेले

HDFC ने देखील गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करून ग्राहकांना धक्का दिला आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग रेट वाढवला. RPLR हा बेंचमार्क कर्ज दर आहे. तुम्ही त्याला किमान व्याजदर देखील म्हणू शकता. HDFC ने त्यात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. वाढलेले दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय वाढेल.

PNB व्यतिरिक्त, ICICI बँक आणि बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी 1 ऑगस्ट 2022 पासून त्यांच्या निधी आधारित कर्ज दर (MCLR) मध्ये सुधारणा केली आहे.

First published:

Tags: Home Loan, Pnb bank