61 लोकांचे पैसे गायब, बॅंक फ्राॅडपासून सावधान, अशी घ्या काळजी

61 लोकांचे पैसे गायब, बॅंक फ्राॅडपासून सावधान, अशी घ्या काळजी

बँक फ्राॅडपासून वाचण्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायलाच हवी

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : सध्या आॅनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, फोन बँकिंग आणि ATM मधून फसवलं जाण्याची संख्या वाढलीय. अशीच एक घटना दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँक (PNB)च्या वसंत विहार ब्रँचच्या समोर आलीय. PNBच्या या शाखेच्या 61 खातेधारकांना अशा प्रकारांनी फसवलं गेलंय. या लोकांच्या बँक खात्यातून एकूण 15 लाख रुपये काढले गेलेत. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतोय फ्राॅडपासून कसा बचाव करायचा?

नक्की काय घडलं?

PNB खातेधारकांना बँकेकडून ATMमधून पैसे काढल्याचा मेसेज आला. प्रत्येकाचं डेबिट कार्ड त्याच्या जवळ असूनही हा प्रकार घडला. विविध ATMमधून हे पैसे काढले गेले. बँकेनं ग्राहकांची यादी तयार केली तेव्ही ती 61वर गेली. इतक्या लोकांचे पैसे गेले.

PNBनं केलं अलर्ट

दिल्लीत घडलेली ही घटना कुणाच्याही बाबतीत घडू शकते. PNBनं सांगितलंय की स्पायवेअर तुमच्या नकळत तुमचा डेटा चोरी केला जातोय. याचा उपयोग आर्थिक गुन्हेगारीसाठी केला जातोय. बँकेचं सांगितलंय की ग्राहकांच्या डेटात फोन काॅल हिस्ट्री, टेस्ट मेसेज, युजर लोकेशन, ब्राऊझर हिस्ट्री, काॅन्टॅक्ट लिस्ट, ईमेल आणि फोटो यांचा समावेश आहे.

असा करायचा बचाव

स्टेप 1 - तुमच्या डिव्हाइसमध्ये आॅटो लाॅक अनेबल करा.

स्टेप 2 - तुमच्या सिमसाठी पिन वापरा. म्हणजे मोबाइल चोरीला गेला तरी तुमचं सिम वापरलं जाणार नाही.

स्टेप 3 - मेमरी कार्डासाठी पासवर्ड ठेवा.

अँटी व्हायरस साॅफ्टवेअर वापरा

चांगलं अँटी व्हायरस स्फाॅटवेअर इन्स्टाॅल करा. कुठलाही नकली साॅफ्टवेअर डाऊनलोड करू नका. अँटी व्हायरसच्या नकली पाॅपअपवर कधीही क्लिक करू नका. तुमच्या सिस्टिमच्या आॅपरेटिंग सिस्टिमला अपडेट ठेवा. पायरटेड अॅप किंवा साॅफ्टवेअरपासून बचाव करा.

बँक खात्यातून पैसे काढले गेले तर?

अशा वेळी कस्टमर केअरला फोन करून कार्ड ब्लाॅक करा. लगेच पोलिसांमध्ये तक्रार करा. तो रेफरन्स बॅकेकडे शेअर करा. सर्वात अखेरीला RBI लोकपालकडे तक्रार नोंदवा.

VIDEO : गावाच्या चौकात बर्निंग बसचा थरार, काही क्षणात जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 04:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading