नवी दिल्ली, 29 जुलै: पंजाब नॅशनल बँकेने (PNB-Punjab National Bank) त्यांच्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीसंदर्भात एक महत्त्वाचा अलर्ट (PNB Alert) पाठवला आहे. बँकेने ग्राहकांना फिशिंग संदर्भात सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. देशभरातील विविध बँका सध्या वाढलेल्या बँकिंग फ्रॉडबाबत अलर्ट करत आहेत. SBI सारख्या मोठ्या बँका देखील अशा फसवणुकीबाबत ग्राहकांना सावध करत असतात. आता PNB ने ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी अलर्ट पाठवला आहे.
पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करत ग्राहकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, 'सोशल मीडियावरील फेक प्रोफाइलपासून सावध राहा. हँडल व्हेरिफाय केल्याशिवाय कोणतंही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणसोबत शेअर करू नका.'
Beware of fake profiles on social media. Do not download any external software or share your personal details without verifying the handle.#Advisory #BeVigilant pic.twitter.com/Cq4bSm1zpu
— Punjab National Bank (@pnbindia) July 28, 2021
याआधी देखील बँकेने अलर्ट जारी करत बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. काही भामटे बँकेचे किंवा आरबीआयचे कर्मचारी असल्याचं सांगून ग्राहकांना फोन करुन आणि त्यांची वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तुम्ही अशा फोन कॉल्सना बळी पडलात तर तुमच्या बँक खात्यातील पैसे लंपास होऊ शकतात.
बँक फ्रॉडपासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स
-कुणाबरोबरही OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करू नका
-फोनमध्ये बँकिंग तपशील सेव्ह करू नका, ही माहिती लीक होण्याची भीती असते
-कुणाशीही एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डाचा तपशील शेअर करू नका
-बँकेच्या अधिकाऱ्यांकडून तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्याचा तपशील विचारला जात नाही हे लक्षात घ्या
-ऑनलाइन पेमेंट करताना सावधानता बाळगा
-पडताळणी केल्याशिवाय एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका
-सोअर्स माहित असल्याशिवाय कोणतंही App फोनमध्ये डाउनलोड करू नका
-अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details, Pnb, Pnb bank