PMC बँक घोटाळ्यातला सहावा बळी, महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

PMC बँक घोटाळ्यातला सहावा बळी, महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर आपल्या पैशांचं काय होणार या धास्तीने खातेदारांचे मृत्यू ओढवले आहेत. आता मुंबईत मुलुंडमध्ये एका 68 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर आपल्या पैशांचं काय होणार या धास्तीने खातेदारांचे मृत्यू ओढवले आहेत. आता मुंबईत मुलुंडमध्ये एका 68 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. केशुमल हिंदुजा यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवला, अशी माहिती आहे. केशुमल हिंदुजा यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना 29 ऑक्टोबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान 30 ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू ओढवला, असं त्यांच्या मुलीने सांगितलं.

किराणा दुकानाच्या मालक

केशुमल हिंदुजा या त्यांच्या भागात किराणा दुकान चालवत होत्या. त्यांना कोणतंही दुखणं किंवा आजार नव्हता पण PMC बँकेतल्या घोटाळ्यामुळे त्या तणावाखाली होत्या, असंही त्यांच्या मुलीने सांगितलं.

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत घोटाळा झाल्यानंतर खातेदारांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. या प्रकरणी बँकेच्या संचालकांना अटक झाली. पण तरीही बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळालेला नाही. पैशांच्या चिंतेमुळे आतापर्यंत 6 खातेदारांचा मृत्यू ओढवला आहे.

पैसे काढण्याची मर्यादा वाढवली

PMC बँकेच्या 4 हजार 355 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. पीएमसी बँक संकटात अडकली आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये केली होती.

========================================================================================

VIDEO : सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा? जाणून घ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी फक्त दीड मिनिटात

Published by: Arti Kulkarni
First published: October 31, 2019, 4:59 PM IST
Tags: moneyPMC

ताज्या बातम्या