PMC बँक घोटाळा : दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाला जुनैद खान, बायकोला भेट दिले 9 फ्लॅट्स

PMC बँक घोटाळा : दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाला जुनैद खान, बायकोला भेट दिले 9 फ्लॅट्स

2005 मध्ये जॉय थॉमसने त्याच्या PA शी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. या दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यात 9 फ्लॅट्सची नोंदणी करण्यात आली. या लग्नाच्या वेळी या महिलेने तिचा जॉब सोडला आणि मी दुबईला जातेय, असं ऑफिसमध्ये सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर :  PMC बँकेचे खातेदार एकीकडे त्यांच्या पैशांसाठी लढा देतायत तर दुसरीकडे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचा निलंबित एमडी जॉय थॉमस याच्या संपत्तीबद्दल अनेक गोष्टी समोर येतायत. जॉय थॉमसच्या प्राथमिक चौकशीत त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही नव्या गोष्टी उघड झाल्या आहेत.

2005 मध्ये जॉय थॉमसने त्याच्या PA शी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. या दुसऱ्या पत्नीच्या नावाने पुण्यात 9 फ्लॅट्सची नोंदणी करण्यात आली.

आपल्या दोन पत्नी आहेत आणि दोन कुटुंबं आहेत हे जॉय थॉमस याने चौकशीत मान्य केलंय.त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना त्याचे PA शी नातेसंबंध जुळले. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो जुनैद खान झाला.

कुठे गेली ती महिला?

या लग्नाच्या वेळी या महिलेने तिचा जॉब सोडला आणि मी दुबईला जातेय, असं ऑफिसमध्ये सांगितलं, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडिया ने दिली आहे. बँकेतल्या कर्मचाऱ्यांना तिच्याबद्दलची ही शेवटची माहिती होती.त्यानंतर ती पुण्याला गेली आणि जॉय थॉमस म्हणजेच जुनैद खानने मुंबई आणि पुण्यात प्रवास सुरू केला. पुण्यामध्ये त्या महिलेने एवढी मालमत्ता कशी विकत घेतली याचा तपास आम्ही करत आहोत, असं पोलिसांनी म्हटलं आहे. PMC बँकेत घोटाळा झाला त्याच काळात या मालमत्ता विकत घेण्यात आल्या का याचा तपास पोलीस करत आहेत.

(हेही वाचा : PMC सारखी बँक गोत्यात आली तर खातेदारांच्या पैशाचं काय होतं?)

जॉय थॉमस यानेही आपण जुनैद खान झाल्याचं चौकशीत कबूल केलं पण आर्थिक बाबींच्या नोंदणीमध्ये मात्र त्याचं नाव जॉय थॉमस असंच आहे. या धर्मांतराचा आणि नाव बदलल्याचा जॉय थॉमसने गैरवापर केला असावा, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हे सगळं कळल्यानंतर जॉय थॉमसच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

मुंबई आणि ठाण्याचे फ्लॅट्स ताब्यात

याआधी पोलिसांनी जॉय थॉमस याच्या मालकीचे मुंबई आणि ठाण्यातले फ्लॅट्स ताब्यात घेतले. यातला एक फ्लॅट त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर आहे.

जॉय थॉमस आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने एका मुलीला दत्तक घेतलं. ती आता 11 वर्षांची आहे. त्यांना 10 वर्षांचा एक मुलगाही आहे. जॉय थॉमस याची दुसरी पत्नी चॉकलेट्सची विक्री करते, तिचं बुटिकही आहे आणि पुण्यातल्या मालमत्तेचं भाडंही तिला मिळतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

62 वर्षांचा जॉय थॉमस PMC बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पोलीस कोठडीत आहे. हा घोटाळा 4 हजार 355 कोटींचा आहे. जॉय थॉमस याच्याबरोबरच HDILचे प्रवर्तक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि बँकेचे माजी अध्यक्ष वायाराम सिंग यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

===============================================================================================

VIDEO : दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा, खिचडीवरुन सोनिया गांधींना लगावला टोला

Published by: Arti Kulkarni
First published: October 14, 2019, 3:54 PM IST
Tags: moneyPMC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading