PMC बँक : ED ने 3830 कोटींची मालमत्ता केली जप्त; पण पैसे काढण्याची मर्यादा वाढल्याने खातेदारांना दिलासा

एकीकडे PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ने कारवाईचे पाश घट्ट करताना 3830 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, तर दुसरीकडे RBI ने खातेदारांना दिलासा देण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 07:41 PM IST

PMC बँक : ED ने 3830 कोटींची मालमत्ता केली जप्त; पण पैसे काढण्याची मर्यादा वाढल्याने खातेदारांना दिलासा

मुंबई, 14 ऑक्टोबर : PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा देणारा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे. खातेदारांना बँकेतून पैसे काढण्याचं लिमिट वाढवण्यात आलं आहे. 25000 ऐवजी आता 40000 रुपये काढता येणार आहेत. बँकेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी सुरू असल्याने ग्राहकांना भुर्दंड बसला आहे. हजारो खातेदार आपल्या हक्काचे पैसे काढता येत नसल्याने हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे ED ने आपल्या कारवाईचं जाळ घट्ट करत बँकेच्या मालमत्तेवर टाच आणली.

सक्तवसुली संचालनालयाने ED सोमवारी PMC बँक घोटाळा प्रकरणी 3830 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी PMC बँकेच्या खातेदारांच्या प्रश्नांविषयी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याशी चर्चा केली.

Loading...

त्यांच्याशी झालेल्या चर्चेअंती व्हिड्रॉल लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा - सोनं खरेदी करताय? सावधान! पावडर मिसळून विकलं जातंय सोनं

3 ऑक्टोबरला PMC बँकेच्या खातेदारांना पैसे काढण्याचं लिमिट 10000 वरून 25 हजार करण्यात आलं होतं. ते आता उद्यापासून 40 हजार करण्यात आलं आहे.

धगधगत्या जीपखाली अडकली होती इवलीशी पिल्लं, माणुसकीचं दर्शन घडवणारा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...