PMC बँक घोटाळा : HDILच्या संचालकांना अटक, 3500 कोटींची मालमत्ता गोठवली

PMC बँक घोटाळा :  HDILच्या संचालकांना अटक, 3500 कोटींची मालमत्ता गोठवली

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

  • Share this:

मुंबई, 3 ऑक्टोबर : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या संचालकांची 3 हजार 500 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.

PMC बँकेचे अधिकारी आणि HDIL च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे 4 हजार 355 कोटींचं नुकसान झालं, असं आढळून आलं आहे. PMC बँकेचे माजी संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि HDIL चे राकेश वाधवान, सारंग वाधवान यांची FIR मध्ये नावं होती.

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जसबीर सिंह मठ्ठा यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा : सोनं आणि चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर)

याआधी, RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.बँकेतल्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत 6 महिने सर्व व्यवहारांवर निर्बंध घातल्याचं RBIने पत्रात म्हटलं होतं. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसंच ठेवी स्वीकारता येणार नाही. या बँकेच्या राज्यात 135 शाखा आहेत. या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ATM मधून विनाशुल्क पैसे काढण्याचा नियम बदलला)

पीएमसी बँकेवर कोणकोणते निर्बंध?

- रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही

- जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही

- बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही

- नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत

- बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही

- निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील, त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

===================================================================================================

VIDEO : रोहित आमदार होणार? मिसेस पवार यांची भावुक प्रतिक्रिया

Published by: Arti Kulkarni
First published: October 3, 2019, 6:12 PM IST
Tags: moneyPMC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading