PMC बँक घोटाळा : बँकेचे माजी MD जॉय थॉमस यांना अटक

PMC बँक घोटाळा : बँकेचे माजी MD जॉय थॉमस यांना अटक

पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

  • Share this:

मुंबई, 4 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र को - ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याआधी या बँक घोटाळ्याप्रकरणी ED ने 6 ठिकाणी छापे टाकले.

जॉय थॉमस यांनी HDIL ला दिलेल्या 2500 कोटींच्या कर्जाप्रकरणी आपली चूक कबूल केली होती. सुरुवातीच्या तपासात PMC बँकेचं 4 हजार 355 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं आढळलं आहे.

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनाही अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या संचालकांची 3 हजार 500 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.

(हेही वाचा : Grand i10 पासून Creta पर्यंत, Hyundai च्या या गाड्यांवर 2 लाखांची सवलत)

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जसबीर सिंह मठ्ठा यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.बँकेतल्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत 6 महिने सर्व व्यवहारांवर निर्बंध घातल्याचं RBIने पत्रात म्हटलं होतं. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसंच ठेवी स्वीकारता येणार नाही. या बँकेच्या राज्यात 135 शाखा आहेत. या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.

=====================================================================================

VIDEO : पुण्यात पावसाचे धुमशान, ठिकठिकाणी साचलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneyPMC
First Published: Oct 4, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या