PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये

PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये

PMC बँकेच्या काही ग्राहकांना 1 लाख रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांनुसार, या विशिष्ट कारणांसाठी खातेदार हे पैसे काढू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC बँकेच्या काही ग्राहकांना 1 लाख रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनेच ही तरतूद केली आहे.

ज्या खातेदारांना वैद्यकीय कारणांसाठी पैशांची गरज आहे ते खातेदार 1 लाख रुपये काढू शकतात. त्याचवेळी लग्न, शिक्षण या कारणांसाठी आणि अपंग, ज्येष्ठ नागरिक या खातेदारांना 50 हजार रुपये काढता येतील.

याआधी RBI ने सगळ्या खातेदारांना 40 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे पण विशेष कारणांसाठी ही रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. PMC बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे काही लोकांचा मृत्यूही ओढवला होता. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला.

पैसे काढताना ही माहिती द्या

एखाद्या खातेदाराच्या घरात मेडिकल इमर्जन्सी असेल तर संबंधित डॉक्टरकडून याचा अंदाजे खर्च काढावा लागेल. यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट, उपचाराची बिलं ही सगळी कागदपत्रं जमा करावी लागतील.

ज्येष्ठ नागरिकांनाही 50 हजार रुपये काढायचे असतील तर वयाचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. अपंगांनीही यासाठी प्रमाणपत्र द्यायचं आहे.लग्नासाठी रक्कम काढायची असेल तर इनव्हिटेशन कार्ड, हॉल बुकिंगची पावती, दागिन्यांची पावती हे सगळं द्यावं लागेल. बँकेमध्ये जमा असलेल्या असलेली 1 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित असते. पण ही सुरक्षित रक्कम वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

=======================================================================================

मतदानाआधी काका-पुतण्याने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 12:27 PM IST
Tags: moneyPMC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading