मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Shram Yogi Mandhan Yojana: फक्त 55 रुपयांची गुंतवणूक अन् आयुष्यभर मिळेल 3 हजार रुपये पेन्शन, असा घ्या लाभ

PM Shram Yogi Mandhan Yojana: फक्त 55 रुपयांची गुंतवणूक अन् आयुष्यभर मिळेल 3 हजार रुपये पेन्शन, असा घ्या लाभ

PM Shram Yogi Mandhan Yojana: फक्त 55 रुपयांची गुंतवणूक अन् आयुष्यभर मिळेल 3 हजार रुपये पेन्शन, असा घ्या लाभ

PM Shram Yogi Mandhan Yojana: फक्त 55 रुपयांची गुंतवणूक अन् आयुष्यभर मिळेल 3 हजार रुपये पेन्शन, असा घ्या लाभ

PM Shram Yogi Mandhan Yojana: प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत मजूर आणि कामगारांना सरकारकडून दरमहा 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत मजूर आणि कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन मिळते.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 9 ऑगस्ट: असंघटित क्षेत्राशी निगडित घटकांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकार विविध योजना राबवत आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या काळात त्यांची आर्थिक स्थितीही खूपच कमकुवत होते. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना' (PM Shram Yogi Mandhan Yojana) आहे. या योजनेंतर्गत मजूर आणि कामगारांना सरकारकडून दरमहा 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत मजूर आणि कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. ही योजना विशेषत: असंघटित क्षेत्रातील घटकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. आज आपण पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
  • या योजनेचा लाभ EPFO ​​किंवा ESIC च्या सदस्यांना घेता येणार नाही. श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावं. आपण 18 वर्षांचे असल्यास या योजनेत दरमहा 55 रुपये गुंतवून, वयाच्या 60 नंतर, तुम्हाला 3 हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
  • या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला श्रम योगी मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://maandhan.in/ ला भेट द्यावी लागेल. आता तुम्हाला Click Here To Apply Now हा पर्याय निवडावा लागेल.
हेही वाचा: India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही
  • यानंतर सेल्फ एनरोलमेंटचा पर्याय निवडा. ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढील प्रक्रियेसाठी पुढं जावं लागेल. पुढील स्टेपवर तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कॅप्चा कोड टाका आणि जनरेट OTP च्या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, OTT ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर वेबसाइटवर तुमची सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. आता तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा लागेल आणि त्याची प्रिंट काढावी लागेल. या प्रक्रियेचं अनुसरण करून तुम्ही श्रम योगी मानधन योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकता.
First published:

Tags: Scheme

पुढील बातम्या