नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : संघटित क्षेत्रांमधील कर्मचाऱ्यांसाठी ज्याप्रमाणे पीएफ किंवा इतर सुविधा आहेत, तशा सुविधा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नसतात. मजूर, गाडा चालवणारे, रिक्षाचालक अशा प्रकारची कामं करणाऱ्या लोकांसाठी सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan Yojana) कामी येते. या योजनेच्या मदतीने या श्रेणीतील व्यक्तींना त्यांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित (Secure old age with pension) करण्यास मदत होते. या योजनेअंतर्गत, दररोज केवळ दोन रुपयांची बचत करुन, वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता.
महिन्याला जमा करा केवळ 55 रुपये -
जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात केली, तर तुम्हाला दरमहा अवघे 55 रुपये जमा करावे लागणार आहेत. दरमहा 55 रुपये जमा करुन, तुम्ही 36 हजार रुपये वार्षिक पेन्शन (Yearly 36 thousand rupee) मिळवू शकता. तसंच, जर एखाद्या व्यक्तीने 40 व्या वर्षी ही योजना सुरू केली, तर त्याला केवळ दरमहा 200 रुपये जमा करावे लागणार आहेत.
लाभार्थ्याचं वय 60 वर्षे झाल्यानंतर त्या व्यक्तीला हे पेन्शन (Government pension schemes) मिळण्यास सुरुवात होईल. यानंतर दरमहा 3000 रुपये किंवा वर्षाला 36 हजार रुपये अशा स्वरुपात ही पेन्शन मिळेल.
नियम आणि अटी -
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 असायला हवं. तसंच वयाच्या 40 वर्षांपर्यंत तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. (Who apply for govt pension scheme) यासाठी आधार कार्ड आणि सेव्हिंग बँक अकाऊंट असणं आवश्यक आहे. असंघटित क्षेत्रातील कोणताही कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पण, ती व्यक्ती अशा प्रकारच्या इतर सरकारी योजनांची लाभार्थी नसावी. तसंच, या व्यक्तीचं मासिक उत्पन्न हे 15 हजार रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. या योजनेसाठी बनवण्यात आलेल्या वेब पोर्टलवर ही नाव नोंदणी होते. यासाठी आधार कार्ड, बचत किंवा जनधन बँक खात्याचं पासबुक, मोबाईल नंबर आणि एक सहमती पत्र अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे सहमती पत्र बँकेतही जमा करावं लागेल. यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी पैसे कापले जाण्यास सुरुवात होईल.
या योजनेसाठी सरकारने श्रम विभागाचं कार्यालय, एलआयसी (LIC) आणि ईपीएफओ (EPFO) या कार्यालयांमध्ये श्रमिक सुविधा केंद्र उभारली आहेत. या कार्यालयांमध्ये जाऊन कामगारांसाठीच्या योजनांबाबत माहिती मिळवू शकता. यासोबतच सरकारने या योजनांची माहिती देण्यासाठी 18002676888 हा टोल फ्री नंबरही जारी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.