• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाँच होणार e-RUPI; जाणून घ्या कशी आहे ही नवी पेमेंट सिस्टीम

आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाँच होणार e-RUPI; जाणून घ्या कशी आहे ही नवी पेमेंट सिस्टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4.30 मिनिटांनी होणाऱ्या कार्यक्रमात ही सिस्टिम देशाला अर्पण करतील

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत देशात यूपीआय पेमेंटला चालना देण्यात आली होती. यासाठी सरकारने भीम नावाचे ॲपही लाँच केले होते. यानंतर आता कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस पेमेंटसाठी (Contactless and Cashless payment) आणखी एक टप्पा पुढे जात, इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर बेस्ड पेमेंट सिस्टीम (Electronic voucher based payment) लाँच करण्यात येत आहे. डिजिटल करन्सीच्या (India Digital currency) दृष्टीने हे भारताचं पहिलं पाऊल असेल. ‘ई-रुपी’ (e-RUPI) असं या पेमेंट सिस्टीमचं नाव असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4.30 मिनिटांनी होणाऱ्या कार्यक्रमात ही सिस्टिम देशाला अर्पण करतील. काय आहे ई-रुपी? (e-RUPI explained) जाणून घेऊयात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), डिपार्टमेंट ऑफ फायनॅन्शिअल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर आणि नॅशनल हेल्थ ॲथॉरिटी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ई-रुपी डेव्हलप करण्यात आली आहे. ही एक पर्सन स्पेसिफिक आणि पर्पज स्पेसिफिक (Person and Purpose specific) पेमेंट सिस्टीम असेल. ई-रुपी हे एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट मीडियम असेल, जे वापरकर्त्याच्या मोबाईलवर एसएमएस स्र्टिंग (SMS string) किंवा क्यूआर कोडच्या (QR Code) स्वरुपात येईल. सुरुवातीला हे गिफ्ट-व्हाऊचरप्रमाणे असणार आहे, जे ठराविक सेंटर्सवर रिडीम करता येईल. विशेष म्हणजे, याला रिडीम करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंग यांपैकी कशाचीच गरज आहे. कोणत्याही फिजिकल इंटरफेसशिवाय ई-रुपी डिजिटलीच सर्व्हिसेसच्या स्पॉन्सर्सना कनेक्ट करेल. हे वाचा - मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: दुकानांच्या वेळा 8 वाजेपर्यंत, मुंबई लोकल बंदच! एनपीसीआयने ही सिस्टिम यूपीआय प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली आहे. यामध्ये बँकांनाही सहभागी करून घेण्यात आलं आहे, ज्या व्हाऊचर्स जारी (e-RUPI vouchers) करतील. कोणत्याही कॉर्पोरेट वा सरकारी एजन्सीला हे मिळवण्यासाठी खासगी किंवा सरकारी पार्टनर बँकांशी संपर्क साधावा लागणार आहे. यावेळी ही सुविधा आपण कोणासाठी आणि कशासाठी वापरणार आहोत याची माहिती देणं आवश्यक आहे. यामध्ये वापरकर्त्याची ओळख त्याच्या मोबाईल नंबरने पटवली जाईल. एखाद्या व्यक्तीच्या नावाने जारी केलेले व्हाऊचर केवळ त्याच व्यक्तीला देण्यात येईल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ई-रुपीच्या मदतीने वेल्फेअर सर्व्हिसेसची लीक प्रूफ डिलिव्हरी होण्यास मदत होईल. मदर अँड चाईल्ड वेल्फेअर स्कीम, टीबी इरॅडिकेशन प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणाऱी औषधे आणि पोषण आहार, तसेच आयुषमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, आणि फर्टिलायझर सबसिडी योजनेमधील सुविधांसाठीही ई-रुपीचा (where will be e-RUPI used) वापर केला जाऊ शकतो. यासोबतच, खासगी (e-RUPI in private organisations) क्षेत्रातील कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना वेल्फेअर अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम अंतर्गत ही डिजिटल व्हाऊचर्स देऊ शकतात; असं सरकारनी स्पष्ट केलं आहे
  First published: