Home /News /money /

महिन्याला 70 हजार रुपये कमावण्याची संधी, मोदी सरकार अशी करेल मदत

महिन्याला 70 हजार रुपये कमावण्याची संधी, मोदी सरकार अशी करेल मदत

देशात रोजगार निर्माण करण्याऐवजी रोजगार देणारे उद्योजक निर्माण करणयावर सध्याच्या केंद्र सरकारचा भर आहे. त्यामुळे उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना सरकार प्रोत्साहन देतंय. हे व्यवसाय करायचे असतील तर सरकार कर्जही देतंय आणि व्यवसाय सुरू झाल्यावर तुम्ही हप्त्यांत ते कर्ज फेडू शकता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जून : देशात रोजगार निर्माण करण्याऐवजी रोजगार देणारे उद्योजक निर्माण करणयावर सध्याच्या केंद्र सरकारचा भर आहे. त्यामुळे उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना सरकार प्रोत्साहन देतंय. हे व्यवसाय करायचे असतील तर सरकार कर्जही देतंय आणि व्यवसाय सुरू झाल्यावर तुम्ही हप्त्यांत ते कर्ज फेडू शकता. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना फायदा झाला आहे. आज आम्ही याच कर्ज योजनेच्या मदतीने सुरू करता येणाऱ्या डेअरी व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. दूध (Milk) हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे, त्यामुळे त्याला आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना नेहमीच चांगली बाजारपेठ मिळते. तुम्ही डेअरी उत्पादनांचा (Dairy Products) व्यवसाय सुरू केलात तर महिन्याला 70 हजार रुपयांची कमाई करू शकता. महत्त्वाचं म्हणजे या उद्योगासाठी तुम्हाला अधिक स्रोत किंवा मशिनरीची गरज लागत नाही. कमी भांडवलातही तुम्हाला हा व्यवसाय करता येतो. सुरुवातीला किती खर्च येईल ? पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये (Project Report) दिलेल्या माहितीनुसार डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी 16.5 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 5 लाख रुपयांची जमवाजमव तुम्हाला करावी लागेल. मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलाच्या 70 टक्के रक्कम तुम्हाला उपलब्ध होईल. बँकेकडून 7.5 लाख रुपयांचं टर्म लोन आणि खेळतं भांडवल (Working Capital) म्हणून 4 लाख रुपये तुम्हाला योजनेतून मिळतील. आपण फ्लेवर्ड मिल्क, दही, बटर, पनीरपासून तुपापर्यंत वेगवेगळे पदार्थ तयार करून विकू शकता. याचबरोबर या व्यवसायाशी संबंधित आणखी अनेक उत्पादनं आहेत जी तयार करून विकल्यास तुम्हाला नफा होईल. कच्चा माल कुठून आणायचा या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार तुम्हाला महिन्यासाठी साधारणपणे 12 हजार 500 रुपयांचं कच्चं दूध (Raw Milk) लागेल. त्याचबरोबर 1 हजार किलो साखर लागेल. फ्लेवर्ड उत्पादनं तयार करण्यासाठी 200 किलो फ्लेवर आणि 625 किलो दुधाचा मसाला आणि मीठही लागेल. या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर तुम्हाला दरमहा साधारणपणे 4 लाख रुपये खर्च करावे लागतील. किती जागा लागेल? डेअरीचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी 1 हजार स्क्वेअर फूट इतकी जागा लागेल. यात 500 स्क्वेअर फुटांचा प्रोसेसिंग एरिया (Processing Area) असेल. तसंच 150 स्क्वेअर फुटांची रेफ्रिजरेशन रूम, 150 स्क्वेअर फुटांचा वॉशिंग एरिया, 100 स्क्वेअर फुटांचा ऑफिस एरिया तुम्हाला ठेवावा लागेल. त्याचबरोबर स्वच्छतागृहासाठी 100 स्क्वेअर फुटांची जागा सोडावी लागेल. किती नफा होणार? डेअरी व्यवसाय सुरू केल्यानंतर एका वर्षात जर तुम्ही 82.50 लाख रुपयांचा माल विकलात. यासाठी तुम्हाला 74.40 लाख रुपयांचा खर्च झाला तर तुम्हाला 8.10 लाख रुपयांचा वार्षिक निव्वळ नफा (Profit) सहज मिळू शकतो. वार्षिक खर्चामध्ये कर्जाचं वार्षिक 14 टक्के व्याज गृहित धरलं आहे. मोदी सरकार कशी मदत करणार डेअरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सरकारची मदत घेऊ शकता. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत (PM Mudra Loan Scheme) तुम्हाला नव्या उद्योगासाठी आर्थिक मदत मिळू शकते. यात भांडवलासाठीच्या मदतीचाही समावेश आहे. तुम्ही जेव्हा या स्कीमबाबत जाणून घेता, तेव्हा तुम्हाला योजनेतील सवलतींची अधिक माहिती दिली जाते, तसंच तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचं स्वरूप लक्षात येतं.
    First published:

    Tags: PM Naredra Modi, Small business

    पुढील बातम्या