नोटबंदीनंतर मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, सोनं खरेदीचे नियम बदलणार

नोटबंदीनंतर मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, सोनं खरेदीचे नियम बदलणार

नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकार काळा पैसा रोखण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 'CNBC आवाज'ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, काळ्या पैशातून सोनं खरेदी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकार एक योजना आणणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकार काळा पैसा रोखण्यासाठी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 'CNBC आवाज'ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, काळ्या पैशातून सोनं खरेदी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकार एक योजना आणणार आहे.

इनकम टॅक्ससाठीच्या अ‍ॅमनेस्टी योजनेच्या आधारे सोन्यासाठीही अ‍ॅमनेस्टी योजना आणण्यात येईल. ज्या सोन्याची पावती नाही अशा सोन्याच्या खरेदीची एका मर्यादेपेक्षा जास्त झाली तर त्याची माहिती द्यावी लागेल. त्याचबरोबर या सोन्याची किंमतही सरकारला सांगावी लागेल.

द्यावा लागेल कर

सूत्रांच्या माहितीनुसार, अ‍ॅमनेस्टी योजनेअंतर्गत सोन्याची किंमत ठरवण्यासाठी व्हॅल्यूएशन सेंटरचं प्रमाणपत्र आणावं लागेल. पावती नसलेल्या सोन्याची माहिती दिली तर एका ठराविक प्रमाणात कर द्यावा लागेल. ही योजना बंद झाल्यानंतर अतिरिक्त सोन्यावर जबर दंडही भरावा लागेल.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांना इशारा, ही खबरदारी घेतली नाहीत तर रिकामं होईल बँक खातं)

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना आकर्षक बनवण्यासाठी मोठे बदल होतील, अशी शक्यता आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड प्रमाणपत्र गहाण ठेवण्याचाही पर्याय दिला जाईल, अशी शक्यता आहे. सोन्यासाठी एक महामंडळ बनवण्याची घोषणाही होऊ शकते.

अर्थमंत्रालयाने पाठवला प्रस्ताव

अर्थमंत्रालयाने या योजनेचा मसुदा तयार केला असून तो कॅबिनेटकडे पाठवण्यात आला आहे. याला लवकरच कॅबिनेटची मंजुरी मिळू शकते. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.

==========================================================================================

VIDEO : 'शरद पवार ठरवतील तोच गटनेता; मी स्पर्धेत नाही'

Published by: Arti Kulkarni
First published: October 30, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading