Home /News /money /

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचे पैसे घरपोच मिळणार, सरकारची खास मोहीम

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचे पैसे घरपोच मिळणार, सरकारची खास मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 21 हजार कोटींची रक्कम हस्तांतरित केली.

    मुंबई, 12 जून : पंधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशांसाठी लाभार्थ्यांना आता खेड्यापाड्यातून शहरांमध्ये बँकांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यासाठी पोस्ट विभागाने (Post Office) नवी योजना तयार केली आहे. याअंतर्गत पोस्टमन (Postman) शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना किसान सन्मान निधीचे पैसे देणार आहेत. यासाठी टपाल विभाग 13 जूनपर्यंत विशेष मोहीम राबवत आहे. या अंतर्गत पोस्टमन घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचा अंगठा हातात धरलेल्या मशीनवर बसवून पीएम सन्मान निधीची रक्कम त्यांना सुपूर्द करतील. केंद्र सरकारच्या वतीने किसान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी पोस्ट विभागावर सोपवण्यात आली आहे. यासाठी सरकारने भारतीय टपाल विभागाला विशेष अधिकार दिले आहेत. वास्तविक, आतापर्यंत शेतकरी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे काढू शकत होते, परंतु लोकांना तेथे जाण्याची गरज नाही. 13 जूनपर्यंत विशेष मोहीम याबाबत टपाल विभागाने टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 13 जूनपर्यंत सर्व टपाल कार्यालयातील पोस्टमनना ही रक्कम दिली जाईल, त्यानंतर ती रक्कम शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम पोस्टमन करणार आहेत. या सुविधेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने घरखर्चाचं बजेट कोलमडलं? EMI कमी करण्यासाठी काय करु शकता? 11 वा हप्ता ट्रान्सफर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 21 हजार कोटींची रक्कम हस्तांतरित केली. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पोहोचलेली नाही. याबाबत सरकारचे म्हणणे आहे की, अनेक कारणांमुळे त्यांचे हप्ता थांबले असून, ते लवकरच त्यांच्या खात्यात जमा केले जातील. Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, 'या' दिवशी लिलावात सहभागी व्हा काही शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागतील या योजनेतील 10 हप्त्यांचे पैसे परत करण्यासाठी शासनाकडून नोटीस आलेल्या अनेक शेतकरी आहेत. सरकारने जुन्या प्राप्तिकर यादीत या शेतकऱ्यांची नावे पाहिली आहेत. म्हणजे हे लोक पात्र नाहीत हे माहित असतानाही या लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. अशा शेतकऱ्यांना सरकारने नोटीस बजावून योजनेंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत करण्यास सांगितले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Farmer, Money, PM Kisan

    पुढील बातम्या