मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अलर्ट, 13 व्या हप्त्याआधी पूर्ण करा हे काम

PM Kisan Yojana: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अलर्ट, 13 व्या हप्त्याआधी पूर्ण करा हे काम

PM Kisan Yojana:  2 गोष्टी अवश्य करा अन्यथा खात्यात येणार नाहीत 2000 रुपये

PM Kisan Yojana: 2 गोष्टी अवश्य करा अन्यथा खात्यात येणार नाहीत 2000 रुपये

PM Kisan Yojana: 2 गोष्टी अवश्य करा अन्यथा खात्यात येणार नाहीत 2000 रुपये

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : काही शेतकऱ्यांना अजूनही पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता मिळाला नाही. तर त्यांच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. 13 वा हप्ता खात्यात येण्याआधी शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. जर हे काम अजूनही केलं नसेल तर लगेच पूर्ण करा. नाहीतर 12 आणि १३ दोन्ही हप्ते खात्यावर येणार नाहीत. जर किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही २ कामं पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.

सरकारकडून अलर्ट

कृषी अधिकारी आणि शासनाने याबाबत माहिती देणारा आदेश काढला आहे, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही व भूमी अभिलेख पडताळणी केली नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. याशिवाय ज्यांनी या दोन गोष्टी अपडेट केल्या नाहीत, त्यांना अद्याप 12 व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत.

KYC कसं करायचं?

जर तुम्ही अजून पर्यंत ईकेवायसी केली नसेल तर तुम्हाला pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर शेतकरी कॉर्नरच्या विभागात ईकेवायसीवर क्लिक करा. तिथे तपशील भरा त्यानंतर OTP येईल तो OTP अपलोड करून E KYC पूर्ण. अन्यथा पुढचा हप्ता खात्यात येणार नाही.

व्हेरिफिकेशन आवश्यक

जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नसेल तर ती तातडीने करून घ्या. त्या भागातील जिल्हा/ब्लॉकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही ते करून घेऊ शकता.

कधी येणार 13 व्या हप्त्याचे पैसे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता लवकरच येणार आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत शेतकऱ्यांना वर्षाचा पहिला हप्ते दिले जातात. त्याचबरोबर दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याचबरोबर तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. यानुसार पीएम किसानचा 13 वा हप्ता डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

First published:

Tags: Farmer, Government, Modi government, PM Kisan