Home /News /money /

PM Kisan Yojana: त्वरित सुधारा ‘या’ चुका, नाहीतर हप्त्याचे 2 हजार रुपये अडकलेच म्हणून समजा

PM Kisan Yojana: त्वरित सुधारा ‘या’ चुका, नाहीतर हप्त्याचे 2 हजार रुपये अडकलेच म्हणून समजा

PM Kisan Yojana: त्वरित सुधारा ‘या’ चुका, नाहीतर 2 हजार रुपये अडकलेच म्हणून समजा

PM Kisan Yojana: त्वरित सुधारा ‘या’ चुका, नाहीतर 2 हजार रुपये अडकलेच म्हणून समजा

PM Kisan Yojana 12th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

  मुंबई, 3 ऑगस्ट: केंद्र सरकारकडून देशातील सर्व स्तरातील लोकांना फायदेशीर ठरतील अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ थेट गरीब आणि गरजू लोकांना दिला जातो. यामध्ये अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी करणं अनिवार्य होतं, ज्याची अंतिम तारीख देखील नुकतीच संपली. याशिवाय इतरही काही चुका आहेत, ज्यामुळे तुमचे हप्त्याचे पैसे (PM Kisan Yojana 12th Installment) अडकू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या चुका काय आहेत आणि तुम्ही त्या कशा दुरुस्त करू शकता. हप्ता अडकण्याची असू शकतात ही कारणं:
  • बँक खातं आणि आधारवरील नावाचं स्पेलिंग वेगळं असणं
  • आधार क्रमांक चुकीचा असल्यास
  • चुकीचा बँक खाते क्रमांक
  • लिंग योग्य न निवडणं
  हेही वाचा: Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल, जुळ्या मुली असल्यास दोघींना मिळणार लाभ या मार्गानं करा समस्या दूर: स्टेप 1 - पीएम किसान पोर्टलद्वारे तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकता. यासाठी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. त्यानंतर 'फोर्मर कॉर्नर' वर जा आणि तळाशी 'हेल्प डेस्क' पर्याय निवडा. स्टेप 2- तुम्हाला कोणत्याही समस्येची तक्रार करायची असल्यास, 'Register Query' वर क्लिक करा आणि नंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खातं क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून 'गेट डिटेल्स' वर क्लिक करा. स्टेप 3- आता तुमच्यासमोर अनेक कारणं दिली गेली असतील, खाते क्रमांक बरोबर नाही, लिंग योग्य नाही इ. यातून तुम्हाला तुमची समस्या निवडायची आहे. नंतर बॉक्समध्ये तुमच्या समस्येबद्दल लिहा आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करा. स्टेप 4- त्यानंतर तुम्ही 'क्वेरी स्टेटस जाणून घ्या' वर क्लिक करून आणि नंतर तुमचा आधार क्रमांक, मोबाइल नंबर किंवा बँक खाते क्रमांक टाकून तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: PM Kisan, Scheme

  पुढील बातम्या