नवी दिल्ली, 07 मार्च: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) आठवा हप्ता सरकार लवकरच जारी करणार आहे. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. याअंतर्गत या वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. आतापर्यंत सरकारकडून सात हप्ते पाठवण्यात आले आहेत.
31 मार्चपूर्वी करा रजिस्ट्रेशन
जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल पण अद्याप नोंदणी केली नसेल तर 31 मार्चआधी या योजनेकरता नोंदणी करा. 31 मार्च आधी रजिस्ट्रेशन करून तुमचा अर्ज स्विकारला गेल्यास होळीनंतर तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील. यासह एप्रिल किंवा मे मध्ये येणाऱ्या पुढील हप्त्याचे देखील पैसे मिळतील.
अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन
योजनेसाठी करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन
-या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वत: या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता.
-याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल
(हे वाचा-LIC च्या खास योजना, जाणून घ्या कशाप्रकारे कराल फायदेशीर गुंतवणूक)
-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा
-याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका
-कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल
-तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल
-ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
रजिस्ट्रेशन करताना द्यावी लागेल ही माहिती
2019 साली सुरू झालेल्या या योजनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही गोंधळ पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये सरकार काही सुधारणा करत आहेत. सरकार या योजनेत पारदर्शकता यावी याकरता प्रयत्न करत आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्जाच्या नमुन्यात आपला भूखंड क्रमांक नमूद करावा लागेल. दरम्यान नवीन नियमांचा या योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर परिणाम होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Modi government, Money, PM Kisan, PM narendra modi, Scheme, Uddhav thackeray