मराठी बातम्या /बातम्या /मनी /PM Kisan: 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी असाल तर त्वरित तपासा या बाबी

PM Kisan: 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी असाल तर त्वरित तपासा या बाबी

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 8व्या हप्त्याचे (8th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये सुमारे 9 कोटी 50 लाख शेतकर्‍यांच्या (Farmers)खात्यात जमा केले आहेत. परंतु अद्याप सुमारे सात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 17 मे: केंद्र सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 8व्या हप्त्याचे (8th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये सुमारे 9 कोटी 50 लाख शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यात जमा केले आहेत. परंतु अद्याप सुमारे सात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 3 कोटी 29 लाख शेतकऱ्यांना अद्याप सातव्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर 3 कोटी 89 लाख शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे किंवा आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांक चुकल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळं तुमच्या खात्यातही पैसे आलेले नसतील तर काही त्रुटी राहिल्या आहेत का याची खात्री करून घ्या आणि त्या दुरुस्त करून घ्या. अन्यथाया योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.यासाठी खालील बाबींची खात्री करून घ्या.

- सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा.

- इथं तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल.

- इथं ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल.

- नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबरमधील पर्यायापैकी एक निवडा.

- आपण निवडलेल्या पर्यायाची माहिती भरा. यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.

- इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात कोणता हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले.

- या योजनेच्याआठव्या हप्त्याशी संबंधित माहितीदेखील इथं मिळेल.

या लोकांचा हप्ता लवकर मिळेल :

ज्या लोकांना FTO is generated and Payment confirmation is pending असा संदेश दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, निधी हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसातच हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे अशा लोकांनी काळजी करू नये. त्यांचे पैसे लवकरच जमा होतील.

काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात.

- पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

- पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261

- पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011- 23381092,23382401

- पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन: 011- 24300606

- आणखी एक हेल्पलाईन: 0120-6025109

- ईमेल आयडी:pmkisan-ict@gov.in

First published:

Tags: Money, PM Kisan, Scheme