PM Kisan Scheme: 20 लाखांपेक्षा जास्त अयोग्य व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा, वाचा आता काय करावं लागेल?

PM Kisan Scheme: 20 लाखांपेक्षा जास्त अयोग्य व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा, वाचा आता काय करावं लागेल?

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Sanman) अंतर्गत तब्बल 20 लाख 48 हजार अयोग्य लाभार्थींच्या खात्यामध्ये 1 हजार 364 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी :  पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Sanman Nidhi) अंतर्गत तब्बल 20 लाख 48 हजार अयोग्य लाभार्थींच्या खात्यामध्ये 1 हजार 364 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे. RTI मधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाब राज्यातील सर्वात जास्त अपात्र लाभार्थींना या योजनेचा फायदा झाला आहे. त्यानंतर आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.

काय आहे योजना?

अल्प आणि सीमांत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं 2019 साली ही योजना सुरु केली आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत जमा करण्यात येतात. 25 डिसेंबर रोजी या योजनेतील सातव्या टप्प्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे.

(हे वाचा- Petrol Diesel Price: पुण्यात सलग तीन दिवस पेट्रोल नव्वदीपार! मुंबईतही इंधन दराचा भडका)

अपात्र शेतकऱ्यांचे दोन गट

या प्रकरणात RTI मधून माहिती मिळाल्यानंतर अपात्र लाभार्थींचे दोन गट करण्यात आले आहेत. या मधील पहिल्या गटात आयकर (Income Tax) भरणारे शेतकरी आहेत. या गटातील शेतकऱ्यांची संख्या 55.48 टक्के आहे. तर दुसऱ्या गटात या योजनेचे पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या 44.41 टक्के शेतकऱ्याचा समावेश आहे.

कोण आहे अपात्र?

- घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.

(हे वाचा- युनिक हेल्थ आयडी काय आहे? कसा केला जातो या ID चा उपयोग)

-केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.

- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी जे पूर्वी शेती करत होते, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

-मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी देखील या योजनेच्या बाहेर आहेत.

कसे पैसे परत करणार?

या योजनेच्या सर्व अयोग्य लाभार्थींना पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, त्यांना जवळच्या ब्रँचला ही माहिती द्यावी लागेल. त्यानंतर बँक खात्यामधून पैसे कट केले जातील. बँक खात्यामध्ये पैसे नसतील तर त्यांना रक्कम बँकेत जमा करावी लागेल.

https://bharatkosh.gov.in/ या ऑनलाईन पोर्टलवर देखील पैसे परत करण्याचा पर्याय आहे. या वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे.

Published by: News18 Desk
First published: January 13, 2021, 3:17 PM IST

ताज्या बातम्या