मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! 9 ऑगस्टला मिळणार PM Kisan चे 2000 रुपये, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का?

खूशखबर! 9 ऑगस्टला मिळणार PM Kisan चे 2000 रुपये, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का?

PM Kisan Samman Nidhi Scheme: तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर 9 ऑगस्ट रोजी तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यापूर्वी जाणून घ्या या योजनेविषयी

PM Kisan Samman Nidhi Scheme: तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर 9 ऑगस्ट रोजी तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यापूर्वी जाणून घ्या या योजनेविषयी

PM Kisan Samman Nidhi Scheme: तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर 9 ऑगस्ट रोजी तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. त्यापूर्वी जाणून घ्या या योजनेविषयी

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या नवव्या हप्त्याची (9th Installment of PM Kisan Samman Nidhi Scheme) वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ही प्रतीक्षा संपणार आहे. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे.

तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला हे माहित करणं आवश्यक आहे की या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही.

अशाप्रकारे तपासा यादीमध्ये तुमचं नाव

-याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता.

हे वाचा-Airtel च्या ग्राहकांसाठी खूशखबर! मिळेल 4 लाखांचा फायदा, वाचा सविस्तर

-याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता.

-'फार्मर कॉर्नर'वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा.

-याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.

-याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स  आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता. तुम्ही मिळणाऱ्या हप्त्याचं स्टेटस देखील अशाप्रकारे जाणून घेऊ शकता.

हे वाचा-HDFC Alert! रविवार रात्रीपर्यंत बंद राहणार या सेवा,त्वरित पूर्ण करा कामं

कशाप्रकारे निश्चित केली जातात लाभार्थ्यांची नावं?

जमिनीच्या रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी या योजनेसाठी केलेल्या अर्जाची आणि त्यासह जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. जर सर्व कागदपत्र योग्य असली तरी शेतकऱ्याचे नाव शेतकरी सन्मान निधीच्या पोर्टलवरील लाभर्थ्यांच्या यादीमध्ये जोडले जाते. पोर्टलवर शेतकरी कुटुंबाचं नाव दाखल करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची असते. लाभार्थी सूचित नाव दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे ट्रान्सफर  केले जातात.

केव्हा मिळतात या योजनेतील पैसे?

ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो.

 

First published: