PM Kisan Scheme: कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आले 2000 रुपये, तुम्हाला 'हे' स्टेटस दिसत असेल तर जाणून घ्या काय आहे अर्थ

PM Kisan Samman Nidhi: मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना असणाऱ्या पीएम शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या टप्प्यातील हप्ता शेतकऱ्यांना पाठवला जात आहे. शेतकऱ्यांना या अंतर्गत 2000 रुपये मिळत आहेत.

PM Kisan Samman Nidhi: मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना असणाऱ्या पीएम शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या टप्प्यातील हप्ता शेतकऱ्यांना पाठवला जात आहे. शेतकऱ्यांना या अंतर्गत 2000 रुपये मिळत आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 डिसेंबर: शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरता शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) ही योजना मोदी सरकारकडून राबवली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध टप्प्यांमध्ये तीन हप्त्यात प्रत्येकी 2 हजार असे 6 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत 6 टप्प्यात शेतकऱ्यांना हप्ते पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांंच्या खात्यामध्ये थेट हे पैसे पाठवले जातात. दरम्यान या योजनेचा सातवा हप्ता पाठवण्याची सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना खत, बी-बियाणं आणि शेतीसंबंधित इतर गोष्टी खरेदी करता याव्यात याकरता सरकारकडून अशाप्रकारे आर्थिक मदत केली जात आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्ही स्टेटस तपासणे आवश्यक आहे. अशावेळी त्या त्या स्टेटसचा अर्थ काय आहे हे माहित असणं देखील गरजेचं आहे. जर  तुमच्या स्टेटसमध्ये  FTO is Generated and Payment confirmation is pending असं लिहलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की, सरकारने तुम्ही दिलेली माहिती कन्फर्म केली आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. (हे वाचा-बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! चेक पेमेंट करण्याची पद्धत बदलणार) याचप्रमाणे तुम्हाला Rft Signed by State Government असं स्टेटस दिसत असल्यास यातील RFT चा अर्थ असा होतो की Request For Transfer. अर्थात तुम्ही दिलेली माहिती तपासण्यात आली आहे आणि ती पुढे ट्रान्सफर करण्यात आली आहे. एकूणच काय लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. अशाप्रकारे खात्यामध्ये ट्रान्सफर होतील पैसे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अप्लाय केल्यानंतर राज्य सरकारकडून तो  अर्ज तुमचा रेव्हेन्यू रेकॉर्ड, आधार क्रमांक आणि बँक खाते  तपासून व्हेरिफाय केला जातो. जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. राज्य सरकारकडून तुमचा अर्ज व्हेरिफाय करून झाल्यानंतर FTO जेनरेट केला जातो. त्यानंतर केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करते. थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क या योजनेबाबत तुम्हाला जर काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कृषी मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266 पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर:155261 (हे वाचा-Post Office बचत खात्यासाठी Internet Banking; आता घरबसल्याच ट्रान्सफर करा पैसे) पीएम शेतकरी सन्मान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401 पीएम शेतकरी सन्मानची नवी हेल्पलाइन: 011-24300606 पीएम शेतकरी सन्मानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109 ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: