मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार देत आहे 4000 रुपये मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार देत आहे 4000 रुपये मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर

मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा फायदा मिळू शकतो.

मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा फायदा मिळू शकतो.

मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा फायदा मिळू शकतो.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 जून: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने (Modi Government) काही योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान यापैकी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan samman nidhi) आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. ज्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे त्यांना हे पैसे पाठवले जातात.

खात्यात येतील 4000 रुपये

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला नोंदणी करणं आवश्यक असतं, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवले जातात. आतापर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांना 8 हप्ते पाठवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत एकूण 9.5 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापही काही शेतकरी असे आहेत जे पात्र तर आहेत मात्र त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत डबल संधी सरकार देत आहे. या तारखेपर्यंत नोंदणी केल्यास तुमच्या खात्यात दोन हप्ते अर्थात 4000 रुपये येऊ शकतात.

हे वाचा-सामान्यांचं बजेट कोलमडणार! आयात शुल्क कमी होऊनही खाद्यतेलाच्या दरात दिलासा नाही

एकाच वेळी अशा शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचे पैसे मिळतील. याकरता तुम्हाला 30 जूनपर्यंत नोंदणी करावी लागेल. याकरता आता तुमच्याकडे 15 दिवस शिल्लक आहेत. 30 जून आधी रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना जुलैमध्ये 8वा हप्ता 2000 रुपये पाठवला जाईल. आता नोंदणी करणाऱ्याचा हा पहिला तर सरकारकडून पाठवण्यात येणारा हा आठवा हप्ता असेल. तर नववा हप्ता ऑगस्टमध्ये पाठवला जाईल. अशाप्रकारे 30 जूनच्या आत रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यात 2000 आणि ऑगस्ट महिन्यात 2000 असा 4000 रुपयांचा लाभ मिळेल. आतापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनाच रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशाप्रकारे डबल फायदा होईल.

योजनेसाठी करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वत: या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता.

-याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल

हे वाचा-SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा लाभ, अशाप्रकारे मिळवा फायदा

-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा

-याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका

-कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल

-तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल

-ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता

First published:

Tags: Money, PM Kisan, Pm modi, PM narendra modi