Home /News /money /

PM Kisan योजनेच्या नियमात झाला 'हा' बदल, आता या कागदपत्राशिवाय नाही मिळणार पैसे

PM Kisan योजनेच्या नियमात झाला 'हा' बदल, आता या कागदपत्राशिवाय नाही मिळणार पैसे

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत (PM Kisan Samman Nidhi) होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने काही नियम बदलले (PM Kisan rules changed) आहेत. आता या योजनेच्या नोंदणीसाठी (PM Kisan registration) रेशन कार्ड अनिवार्य (Ration Card Mandatory) करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 18 जानेवारी: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत (PM Kisan Samman Nidhi) होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने काही नियम बदलले (PM Kisan rules changed) आहेत. आता या योजनेच्या नोंदणीसाठी (PM Kisan registration) रेशन कार्ड अनिवार्य (Ration Card Mandatory) करण्यात आलं आहे. रेशनकार्ड क्रमांक योजनेच्या पोर्टलवर दाखल केल्यानंतरच शेतकरी पती, पत्नी किंवा त्या कुटुंबातल्या कोणत्याही एका सदस्याला पीएम शेतकरी सन्मान निधीचा (PM KISAN Installment) लाभ मिळू शकेल. या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी रेशनकार्ड क्रमांक देणं बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोडदेखील करावी लागेल. या कागदपत्रांची आवश्यकता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय रेशनकार्डची पीडीएफदेखील अपलोड करावी लागणार आहे. तसंच आता सात-बारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता नसेल. या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. यामुळे या योजनेतले घोटाळे कमी होतील, असा विश्वास सरकारला वाटतो. शिवाय नोंदणी करणं पूर्वीपेक्षा सोपं होणार असून, शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. हे वाचा-SEBI कडून Delhivery, Radiant आणि Veranda Learning या तीन आयपीओंना मंजुरी वर्षाला मिळतात 6000 रुपये पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशभरातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. सरकार ही रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ऑनलाइन ट्रान्सफर करतं. तुम्हीही शेतकरी असाल आणि अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर काळजी करू नका. तुम्हीसुद्धा पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी तुमचं नाव नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल. तीन हप्त्यांमध्ये मिळतात पैसे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात 6000 रुपयांची रक्कम प्रत्येकी 2000 रुपयांच्या एकूण तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. हा हप्ता दर चार महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर होतो. पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो. हे वाचा-PPF : सुरक्षित गुंतवणूक करुन बना करोडपती; दरमाह किती गुंतवणूक करावी लागेल अशी पाहता येईल लाभार्थ्यांची यादी शेतकऱ्यांनी प्रथम पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं. त्यानंतर त्या ठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करावं. त्यानंतर लाभार्थी यादीच्या लिंकवर क्लिक करून राज्य, जिल्हा, उपविभाग, ब्लॉक आणि गावाचा तपशील भरावा. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण यादी येईल. शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत सध्या बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी हा एक महत्त्वाचा बदल आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता रेशन कार्डच्या अनिवार्यतेसह इतर कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.
First published:

Tags: PM Kisan

पुढील बातम्या