मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan:खात्यात अद्याप 2 हजार जमा झाले नाही? लगेचच करा 'या' नंबरवर फोन

PM Kisan:खात्यात अद्याप 2 हजार जमा झाले नाही? लगेचच करा 'या' नंबरवर फोन

देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली.  आठव्या हप्त्याची रक्कम देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 21 मे: देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. दरम्यान आता पीएम किसान योजने (PM Kisan Samman Nidhi Yojana)च्या आठव्या हप्त्याची रक्कम देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 19 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केलेत.

PM Kisan योजनेअंतर्गत लघू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले जातात. मात्र अजूनही काही शेतकरी या हप्त्यापासून वंचित आहे. त्याच्या बँक खात्यात रक्कम अद्याप जमा झालेली नाही आहे. अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत सरकारनं जाहीर केलेल्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकतात. याव्यतिरिक्त शेतकरी आपल्या भागातील लेखापाल आणि कृषी अधिकाऱ्याशीही संपर्क करु शकतात.

हेही वाचा- RBI चा मोठा निर्णय, मोदी सरकारच्या खजिन्यात पडणार भर

शेतकरी अशी करु शकतात तक्रार

PM किसान योजनाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी किंवा समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी उपलब्ध आहे. पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261 आहे. या व्यतिरिक्त पीएम किसान टोल फ्री नंबर 18001155266 आणि पीएम किसान लँडलाइन नंबर वर 011-23381092, 011-24300606 देखील आहे. पीएम किसानसाठी आणखी एक हेल्पलाइन नंबर 0120-6025109 उपलब्ध आहे. तसंच ईमेल आयडी mkisan-ict@gov.in आहे.

हेही वाचा- SSC Exams: कोर्टानं फटकारल्यानंतरही परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, सोमवारी गुणपत्रिकेच्या संदर्भात नियमावली होणार जाहीर

म्हणून हप्त्याचे पैसे जमा होताना येते अडचण

कधी- कधी सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. मात्र ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही. पैसे जमा न होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर आणि बँक खाते नंबर यात काही चूक असण्याची शक्यता असते. यात काही चूक असल्यास ती सुधारण्यासाठी किसान रेकॉर्ड सुधार किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर तुम्ही जाऊ शकता. किंवा पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट https://pmkisan.gov.in/ तुम्ही व्हिजीट करु शकता.

First published:

Tags: Farmer, Modi government, PM Kisan