Home /News /money /

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेचे पैसे खात्यात आले का? घरबसल्या कसं तपासणार?

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेचे पैसे खात्यात आले का? घरबसल्या कसं तपासणार?

PM Awas Yojana : देशातील अनेक कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत प्रथमच घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून 2.67 लाख रुपयांची सबसिडी दिली जाते.

    मुंबई, 8 मार्च : देशातील निम्नवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojna) राबवते. या अंतर्गत सरकार घर बांधणाऱ्याला सबसिडी देते. देशातील अनेक कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत प्रथमच घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून 2.67 लाख रुपयांची सबसिडी दिली जाते. अशी अनेक कुटुंबे आहेत जी या योजनेच्या अटींचे पूर्णपणे पालन करतात. पीएम आवास योजनेसाठी अर्ज केला आहे, मात्र आजपर्यंत त्यांच्या खात्यात अनुदान आलेले नाही. ज्यांनी पीएम आवास योजनेसाठी अर्ज केले आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत सबसिडी कुठे अडकली आहे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. Women’s Day: योग्य गुंतवणूक करुन मुलींचं भविष्य करा सुरक्षित, शिक्षण आणि लग्नाचं टेन्शन राहणार नाही सबसिडी तपासता येईल अर्ज करताना चुकीची माहिती फॉर्ममध्ये टाकल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे अनुदान रखडते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट ही आहे की, जो अर्ज करत असेल त्यांनी पहिल्यांदाच घर खरेदी केले पाहिजे. जर तुम्ही ही अट पूर्ण केली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर पीएम आवास योजनेंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी सरकारने उत्पन्नानुसार तीन श्रेणी तयार केल्या आहेत. ज्यामध्ये वार्षिक 3 लाख रुपये, वार्षिक 6 लाख रुपये आणि वार्षिक 12 लाख रुपये उत्पन्नाच्या तीन श्रेणी तयार केल्या आहेत. अर्जदाराने ज्या वर्गवारीत अर्ज केला आहे आणि त्याचे उत्पन्न आणि वास्तविक उत्पन्न यात तफावत असल्यास त्याचे अनुदान बंद केले जाते. आधार आणि इतर कागदपत्रांमध्ये फॉर्म भरताना चुका झाल्या तरी अनुदान मिळण्यास विलंब होतो. डॉलरच्या तुलनेत रुपया 80-82 पर्यंत घसरण्याची शक्यता, असं झाल्यास काय परिणाम होईल; तज्ज्ञ काय सांगतात? पैसे कुठे आणि कसे तपासायचे? सेटल होण्यापूर्वी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmaymis.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला 'सर्च बेनिफेशियरी' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Search By Name या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे नाव इथे टाकावे लागेल. यानंतर, तुमच्या नावाप्रमाणे अर्ज केलेल्या सर्व लोकांची यादी दिसेल. तुम्ही या यादीत तुमचे नाव तपासू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Money, Scheme

    पुढील बातम्या