सुवर्णसंधी! 1.95 लाखामध्ये तुम्ही सुरू करू शकता लाखोंचा नफा देणारा व्यवसाय

सुवर्णसंधी! 1.95 लाखामध्ये तुम्ही सुरू करू शकता लाखोंचा नफा देणारा व्यवसाय

हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला तर खर्च वाढू शकतो. मात्र जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा या तत्वावर तुम्ही निर्णय घेऊ शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 21ऑक्टोबर: व्यवसाय करायचं सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आश्यकता असतेच असं नाही. आता तुम्ही 1 लाख 95 हजार रुपयांमध्ये उत्तम व्यवसाय करू शकता. त्यासाठी कोणत्याही खास कौशल्यांची आवश्यता हवीच असं नाही. 2 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने एकदा वापरलेल्या प्लास्टिकचा पुन्हा वापर करण्यावर बंदी आणली आहे. असं प्लास्टिक बाजारात अथवा ग्राहक, नागरिकांकडे दिसलं तर मोठा दंड आकारण्यात येणार आहे. प्लास्टिक बंद झाल्यानंतर अशी अनेक उत्पादनं आहेत जी बाजारात आपलं स्थान निर्माण करून तुम्हाला चांगले पैसे मिळवून देऊ शकतात.

भारतातील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्र सरकारनं आजपासून केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काही कंपन्या आणि व्यवसायिकांचं नुकसान होणार आहे. मात्र याच संधीचा फायदा घेऊन नव्या उद्योगधंद्यांना चालना मिळू शकते. तुम्ही व्यावसाय करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एक नवीन व्यावसायाची संकल्पना सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कमी पैशांमध्ये चांगला व्यावसाय करू शकता.

1 लाख 95 हजार रुपयांमध्ये तुम्ही व्यवसाय करू शकता

हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला तर खर्च वाढू शकतो. मात्र जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा या तत्वावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. सणासुदीला लोक घरी वेगवगळ्या प्रकारची सजावट करतात. याशिवाय प्लास्टिकपेक्षा बाजारात बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना विशेष प्राधान्य दिलं जात असल्यानं ह्या वस्तू उदा. खुर्ची, पाट, टेबल इत्यादी तर सजावटीच्या लोकरीच्या कापडाच्या किंवा कागदाच्या सजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय तुम्ही करू शकता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बांबूपासून तयार केलेल्या बाटलीचं अनावरण केलं आहे. ह्या बाटलीतील पाण्याची क्षमता साधारण 750 एमएल असणार आहे. याची किंमत 300 रुपये असेल. ही बाटली पर्यावरण पूरक आणि टिकाऊ आहे. 2 ऑक्टोबरपासून खादी दुकानात ही बाटली ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Renault ची नवी Kwid लाँच, इथे पाहा फीचर्स आणि किंमत

व्यावसायासाठी किती रुपये खर्च होणार?

तुम्ही जर हा व्यवसाय करायचा विचार करणार असाल तर खादी ग्रामोद्योगच्या अहवालानुसार साधारण या व्यवसायासाठी 1 लाख 70 हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी करावा लागेल. याबाबत इतर माहिती मिळवण्यासाठी या (https://www.kviconline.gov.in/pmegp/pmegpweb/docs/commonprojectprofile/BAMBOO%20ARTICLE%20MANUFACTURING%20UNIT.pdf). लिंकवर क्लिक करा आणि इतर खर्चाबाबत माहिती घेऊ शकता.

बांबूपासून आणखी कोणत्या गोष्टी तयार होतात

बांबूचा वापर कंस्ट्रक्शनसाठी वापरला जातो. याशिवाय बांबूपासून बासरी तयार केली जाते. हॅण्डक्राफ्ट, स्त्रियांचे अलंकार, सायकल आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तयार केली जातात. कृ्षी मंत्रालयातील अधिकाऱ्यांता असा दावा आहे की घरं अथवा कंस्ट्रक्शनमध्ये वापरण्यात येणाऱ्या छतासाठीही बांबूच्या शेडचा वापर करण्यात येईल.

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या