रुपयानं गाठला तळ; पण हे मंत्री म्हणतात हा तर रुपयाचा सर्वोत्तम काळ!

रुपयानं गाठला तळ; पण हे मंत्री म्हणतात हा तर रुपयाचा सर्वोत्तम काळ!

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरून ती ७४ पर्यंत आली आहे. शेअर बाजारही ७९२ अंकांनी कोसळला आहे. पण केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मात्र सध्याचा काळ हा भारतीय चलनासाठी सर्वात चांगला काळ आहे, असं वाटतंय.

  • Share this:

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज नवा नीचांक गाठत असतानाही केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मात्र सध्याचा काळ हा भारतीय चलनासाठी सर्वात चांगला काळ आहे, असं वाटतंय. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात या अर्थाचं वक्तव्य केलं.

‘गेल्या ५ वर्षात रुपयाची घसरण फक्त ७ टक्क्यांनी झाली आहे. भारतीय चलनासाठी हा सर्वोत्तम कामळ आहे’, गोयल म्हणाले. ते हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिटमध्ये बोलत होते.

वास्तविक शुक्रवारी रुपयाच्या दराने आतापर्यंतचा तळ गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरून ती ७४ पर्यंत आली आहे. शेअर बाजारही ७९२ अंकांनी कोसळला आहे. गेल्या ४ दिवसात ९ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

रिझर्व बँकेनंही आपल्या पतधोरणात कुठलाच बदल केलेला नाही. रेपो रेट ६.५ टक्के एवढाच ठेवण्यावर रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल ठाम राहिले. रेपो रेट वाढेल, अशी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची अपेक्षा होती. पण आता ती शक्यता नसल्याने घसरत्या रुपयाला तोही आधार मिळालेला नाही. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपयाच्या दराने डॉलरच्या तुलनेत  ७४चा टप्पा ओलांडला आहे.  सध्याच्या आंंतरराष्ट्रीय परिस्थितीत रुपयाची घसरण मध्यम स्वरूपाची असल्याचं, पटेल यांनीही नोंदवलं.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री असलेले पियूष गोयल म्हणाले की, भारतातलं जॉब मार्केटही बदलत आहे. आता केवळ सरकारी नोकरीच्या भरवशावर विकास होणार नाही. पूर्वी सर्वांना रेल्वेत किंवा इतर सरकारी सेवांमध्ये नोकरी हवी असायची. आता नव्या उद्योगांसाठीच्या कल्पना पुढे येत आहेत. नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं सरकारी धोरण आहे, असंही गोयल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 05:37 PM IST

ताज्या बातम्या