मोदी सरकार 'महिला स्वरोजगार योजने'अंतर्गत महिलांच्या खात्यात पाठवणार 1 लाख? वाचा काय आहे सत्य

मोदी सरकार 'महिला स्वरोजगार योजने'अंतर्गत महिलांच्या खात्यात पाठवणार 1 लाख? वाचा काय आहे सत्य

सध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 'महिला स्वरोजगार योजना' या योजनेअंर्गत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1 लाख पाठवत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : कोरोना काळात (Coronavirus) सोशल मीडियावर खोट्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. दररोज काहीना काहीतरी फेक मेसेजमधून वेगवेगळे दावे केले जात आहेत. सध्या आणखी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार 'महिला स्वरोजगार योजना' या योजनेअंर्गत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1 लाख पाठवत आहे. मात्र भारत सरकारची संस्था असणाऱ्या पीआयबीने (PIB) या व्हायरल मेसेजमागची सतत्या समोर आणली आहे. वाचा काय आहे सत्य...

पीआयबीने हा करण्यात आलेला दावा फेटाळून लावला आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. अशाप्रकारे कोणतीही योजना सरकार राबवत नसल्याचे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे.

(हे वाचा-खूशखबर! 30 टक्के स्वस्त होतील नवीन कार, सरकार लवकरच लागू करणार ही पॉलिसी)

कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांची होणारी फसवणूक वाढली आहे. त्यात ऑनलाइन फसवणुकीने डोकं वर काढले आहे. दर दिवशी नवीन फेक न्यूज व्हायरल होत आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्यूरोने या व्हायरल बातमीचे खंडन केले आहे आणि असे म्हटले आहे की सरकारने अशी कोणतीही योजना आखण्याचा निर्णय घेतला नाही आहे. त्याचप्रमाणे अशा बातम्या पसरू नयेत यासाठी देखील खबरदारी घेण्यात येत आहे.

(हे वाचा-या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळेल गॅस सिलेंडर, 30 सप्टेंबर आहे शेवटची तारीख)

PIB Fact Check केंद्र सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयांबाबतीत चुकीची माहिती पसरण्यापासून रोखण्याचे  काम करते. सरकार संबंधित कोणती माहिती खोटी आहे की खरी हे जाणण्यासाठी  PIB Fact Check ची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही व्यक्ती  PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्वीट, फेसबुक पोस्ट किंवा URL WhatsApp क्रमांक 918799711259 वर पाठवू शकतात. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com वर मेल देखील करता येईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 19, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या