महिलांना सव्वा लाख रुपये देणारी 'ती' सरकारी योजना Fake; महिला स्वाभिमान योजनेच्या नावे झाली होती VIRAL

महिलांना सव्वा लाख रुपये देणारी 'ती' सरकारी योजना Fake; महिला स्वाभिमान योजनेच्या नावे झाली होती VIRAL

भारत सरकारची एक नवी योजना येते आहे. त्याअंतर्गत महिलांना 1.4 लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशा अर्थाची बातमी किंवा सोशल मीडिया पोस्ट तुम्ही वाचली होती का? सावधान! ही योजना खरी नाही...

  • Share this:

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : भारत सरकारची एक नवी योजना येते आहे. त्याअंतर्गत महिलांना 1.4 लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशा अर्थाची बातमी किंवा सोशल मीडिया पोस्ट तुम्ही वाचली होती का? भारत सरकार 'महिला स्वाभिमान योजनेअंतर्गत' सर्व महिलांना 1.4 लाख रुपये देत आहे, असी पोस्ट whatsapp वरूनसुद्धा फिरत होती. पण अशी कुठलीही योजना नसल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. ही बातमी खोटी असल्याचं Tweet पत्रसूचना कार्यालयातर्फे (PIB) करण्यात आलं आहे.

PIB ने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारची अशी कुठलीही योजना नाही. स्त्री स्वाभिमान अशी एक मिळत्या जुळत्या नावाची सरकारी योजना आहे. पण त्या अंतर्गत कुठलेही रोख पैसे देण्यात येणारे नाहीत. ही योजना सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या छोट्या उद्योगांना आणि बचतकटांना प्रोत्साहन देणं ही आहे.

खोटे वृत्त : भारत सरकार 'महिला स्वाभिमान योजनेअंतर्गत' सर्व महिलांना 1.4 लाख रुपये देत आहे

गेले काही दिवस सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर फिरत असणारी महिला स्वाभिमान योजनेची माहिती खोटी आहे. सरकारी योजनेच्या नावावर कुणीही फसू नये. भुलून कोणाच्याही जाळ्यात अडकू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

तुमच्या पत्नीचं आधार कार्ड असेल, तर त्वरित अर्ज करा. तिच्या नावावर  एक लाख 40 हजार रुपये मिळू शकतात. अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होती. पण पीआयबीने ती खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारची अशी कुठलीही योजना नाही.

---------------------

अन्य बातम्या

देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती

लोकांचा जीव धोक्यात घालणारा गुजरात सरकारचा धक्कादायक निर्णय, पाहा SPECIAL REPORT

पती घेत होता चारित्र्यावर संशय, पत्नीने मुलाच्या मदतीने काढला असा 'काटा'

पोलिस अधिकाऱ्याचा फोटो होतोय व्हायरल, युझर म्हणाले ‘तूच खरा सिंघम!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 5, 2019, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading