मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PhonePe वापरणे महागलं? मोबाईल रिचार्जवर आकारले जातायेत अधिकचे पैसे

PhonePe वापरणे महागलं? मोबाईल रिचार्जवर आकारले जातायेत अधिकचे पैसे

डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे (Digital Payment Company PhonePe) वापरणे महाग झालं आहे. मोबाईल रिचार्जवर 1 ते 2 रुपये फ्लॅटफॉर्म फी चार्ज  केली जात आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 22 ऑक्टोबर : ऑनलाईन ट्रान्जॅक्शनमुळे (Online Transaction) व्यवहार अगदी सोपे झाले आहेत. अनेक कामं मोबाईलवरुन काही मिनिटात होऊ लागली आहेत. या ऑनलाईन ट्रान्जॅक्शनसाठी तुम्ही जर फोन फे अॅपचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण किराणा सामान खरेदी, गॅस सिलेंडर बुकिंग, पाणी बिल, मोबाईल रिचार्ज यासाठी तुम्ही फोन पेचा वापर करत असाल तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल. कारण डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे (Digital Payment Company PhonePe) वापरणे महाग झालं आहे. फोन पे ने काही यूजर्सकडून मोबाईल रिचार्जवर 1 ते 2 रुपये फ्लॅटफॉर्म फी चार्ज (Platform Fee) करणे सुरु केले आहे. कोणत्याही पेमेंट मोडद्वार (UPI, Credit card, Debit Card, Phone Pay Wallet) रिचार्ज केला तरी हा अधिकचा चार्ज केला जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जे लोक या प्रयोगाचा भाग आहेत त्यांच्यासाठी 50 ते 100 रुपयांच्या व्यवहारासाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आकारजे जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रवक्त्यांनी सांगितले की, हा एक स्मॉल बेसवर प्रयोग आहे. बहुतेक यूजर्सकडून कदाचित 1 रुपये आकारले जात आहेत आणि ते अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. मात्र याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. सरकारी बँकेत खातं असणाऱ्यांसाठी योजना; दरमाह 28 रुपयात मिळणार 4 लाखांचा फायदा, कसा? 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट फोनपे वर सर्व विमा कंपन्यांची प्रोडक्ट्स खरेदी करता येणार अलीकडेच, फोनपेने माहिती दिली की त्याला जीवन विमा आणि जनरल इंश्युरन्स प्रोडक्ट विक्रीसाठी IRDAI कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. कंपनीने म्हटले होते की, यामुळे आता आम्ही 30 कोटीहून अधिक यूजर्सना विमा संबंधित सल्ला देऊ शकतो. IRDAI ने फोनपेला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता PhonePe भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.
First published:

Tags: Bank, Money, Online payments

पुढील बातम्या