मराठी बातम्या /बातम्या /मनी /पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे एनसीडी आजपासून उपलब्ध

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे एनसीडी आजपासून उपलब्ध

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Power Finance Corp ltd) 15 जानेवारीपासून परिवर्तनीय डेबेंचर्स जारी करीत आहे. अल्प आणि मध्यम मुदतीमध्ये पीएफसी एनसीडीचा दर सार्वजनिक बँकेच्या एफडी दराच्या आसपास असणार आहे. या एनसीडीसाठी पीएफसीने इश्यूची किंमत 500 कोटींच्या जवळ ठेवली आहे.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Power Finance Corp ltd) 15 जानेवारीपासून परिवर्तनीय डेबेंचर्स जारी करीत आहे. अल्प आणि मध्यम मुदतीमध्ये पीएफसी एनसीडीचा दर सार्वजनिक बँकेच्या एफडी दराच्या आसपास असणार आहे. या एनसीडीसाठी पीएफसीने इश्यूची किंमत 500 कोटींच्या जवळ ठेवली आहे.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Power Finance Corp ltd) 15 जानेवारीपासून परिवर्तनीय डेबेंचर्स जारी करीत आहे. अल्प आणि मध्यम मुदतीमध्ये पीएफसी एनसीडीचा दर सार्वजनिक बँकेच्या एफडी दराच्या आसपास असणार आहे. या एनसीडीसाठी पीएफसीने इश्यूची किंमत 500 कोटींच्या जवळ ठेवली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 जानेवारी : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) या सरकारी क्षेत्रातल्या  कंपनीने 15 जानेवारीपासून नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCD) उपलब्ध केले आहेत. अल्प मुदत आणि मध्यम मुदतीसाठी या कंपनीने हे एनसीडी कमी दरात उपलब्ध केले आहेत. सरकारी बँकांद्वारे मुदत ठेवीवर सध्या दिल्या जाणाऱ्या व्याजदराएवढ्या दरातच एनसीडी उपलब्ध आहेत; पण दीर्घ काळासाठी व्याज दर अधिक चांगले आहेत. पीएफसी कंपनी 10 वर्षांच्या एनसीडीसाठी फ्लोटिंग रेटचा (Floating Rate) पर्यायही उपलब्ध करत आहे. त्यासाठी बेस इश्यू साइज 500 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे; पण 4500 कोटी रुपयांपर्यंतची सब्स्क्रिप्शन घेऊ शकतो. त्यामुळे हे एकूण पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.

पीएफसीचे हे एनसीडी डीमॅट (Demat) प्रकारात उपलब्ध होतील आणि गुंतवणूकदार यूपीआयच्या (UPI) माध्यमातूनही पेमेंट करू शकतात. प्रत्येक एनसीडीचे दर्शनी मूल्य (Face Value) 1000 रुपयांचे असेल आणि किमान 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. इश्यूची अंतिम मुदत 29 जानेवारी आहे; मात्र मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा इश्यू त्याआधीच बंद होऊ शकतो. पीएफसीच्या एनसीडीमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर आहे की नाही हे पाहू या आणि आणखी काय पर्याय आहेत का, ते पाहू या.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमी कालावधीत कमी दर

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीकरिता कुपन रेट क्रमशः 4.8 टक्के आणि 5.8 टक्के आहेत. भारतीय स्टेट बँक तीन वर्षं ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 5.3 टक्के दराने व्याज देते आहे. पाच ते 10 वर्षांच्या कालावधीच्या मुदत ठेवींवर व्याजदर 5.4 टक्के आहे. या प्रकारच्या इश्यूमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार किरकोळ गुंतवणूकदार समजले जातात.

निश्चित परतावा हवा असेल तर दीर्घ मुदत निवडणं फायदेशीर

दीर्घ मुदतीत पीएफसी चांगला व्याजदर देत आहे. तिमाही तत्त्वावर पेआउट (Payout) मिळवण्याचा पर्यायही यात उपलब्ध आहे. तीन आणि पाच वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूकदारांना वर्षात एकदाच पेआउट मिळेल. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की यात गुंतवणूक करायची की नाही, हे व्याजदराच्या आउटलूकच्या आधारावर ठरवावं. आगामी काही काळात व्याजदर कमीच असतील. या पार्श्वभूमीवर निश्चित परतावा देणारी माध्यमं शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा चांगला पर्याय होऊ शकतो.

- 10 वर्षांचा कालावधी निवडला आणि तिमाही पेआउटचा पर्याय निवडला, तर व्याजदर 6.82 टक्के असेल. वार्षिक पेआउटसाठी व्याजदर सात टक्के असेल.

- फ्लोटिंग रेट निवडण्याचाही पर्याय असेल, जिथे दर वर्षी व्याज दर बदलत राहतील. हा बदलता व्याज दर 10 वर्षांच्या सरकारी सिक्युरिटीजच्या आधारावर असेल.

- 15 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी तिमाही पेआउट पर्याय निवडल्यास व्याज दर 6.97 टक्के असेल. वार्षिक पेआउटसाठी व्याजदर 7.15 टक्के असेल.

दुसरे पर्याय कोणते?

किरकोळ गुंतवणूकदारांना निश्चित उत्पन्न देणारे असे फारच कमी पर्याय आहेत, जे 6.82 टक्के ते 7.15 टक्के यांच्या दरम्यान व्याज देत असतील. पीएफसी एनसीडीच्या फ्लोटिंग रेटचे एनसीडी बाँड्स (2020) हा  गुंतवणूकदारांकडे चांगला पर्याय असेल. सध्या सरकार त्यावर 7.15 टक्के दराने व्याज देत आहे. हा व्याज दर प्रति सहा महिन्यांनी बदलत असतो.

- पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमअंतर्गत अल्प मुदत आणि मध्यम मुदतीच्या मुदत ठेवीवर (Fixed Deposit) चांगलं व्याज मिळतं आहे. तीन वर्षांच्या ठेवीसाठी 5.5 टक्के, तर पाच वर्षांच्या ठेवीसाठी 6.7 टक्के व्याजदर आहे.

First published:

Tags: Business News, Economy, Personal finance, Rate of interest, Small business, Small investment business