मराठी बातम्या /बातम्या /मनी /

... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम

... तर PF काढताना द्यावा लागणार नाही टॅक्स; जाणून घ्या नेमका काय आहे नियम

पीएफमधून रक्कम काढल्यानंतर त्यावर कर (Tax) द्यावा लागतो का असा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. जाणून घेऊया या प्रश्नांचं उत्तर.

पीएफमधून रक्कम काढल्यानंतर त्यावर कर (Tax) द्यावा लागतो का असा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. जाणून घेऊया या प्रश्नांचं उत्तर.

पीएफमधून रक्कम काढल्यानंतर त्यावर कर (Tax) द्यावा लागतो का असा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. जाणून घेऊया या प्रश्नांचं उत्तर.

नवी दिल्ली, 23 जून: नोकरदार वर्गासाठी पीएफ (PF) हा महत्वाचा आर्थिक घटक असतो. नोकरी करताना त्याने बचत केलेली रक्कम या खात्यात जमा होत असते. या रकमेवर नोकरदार वर्गाचे सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे प्लॅनिंग अवलंबून असते. त्यामुळे पीएफला अनन्य साधारण महत्व असते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाने सर्व आर्थिक गणितं बदलून गेली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी मोठा वैद्यकीय खर्च उदभवू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी पीएफमधून काही रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. आपत्कालीन स्थितीत नोकरदार व्यक्ती या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. तसेच कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, कडक निर्बंधांमुळे रोजगार, नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे अशा काही व्यक्तींना आतापर्यंत पीएफच्या माध्यमातून जमवलेली पुंजी सहायक ठरत आहे. परंतु, पीएफमधून रक्कम काढल्यानंतर त्यावर कर (Tax) द्यावा लागतो का असा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. जाणून घेऊया या प्रश्नांचं उत्तर.

हे वाचा-या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरासाठी पुढील वर्षापर्यंत मिळणार अ‍ॅडव्हान्स

प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) विड्रॉल (Withdrawal) करताना त्यावर टॅक्स द्यावा लागतो का याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. परंतु, जर तुम्ही सातत्याने 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ नोकरी (Job) केली असेल तर पीएफ काढताना तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही. तसेच यासाठी तुम्ही केवळ एकाच कंपनी किंवा फर्ममध्ये नोकरी करत असलं पाहिजे अशी कोणतीही अट नाही. याचाच अर्थ की तुम्ही एकापेक्षा अधिक कंपन्या किंवा फर्मसोबत काम केलं असेल आणि तुम्हाला पीएफ विड्रॉल करायचा असेल तर तुम्हाला त्यावर कोणाताही कर भरावा लागणार नाही. मात्र नोकरी बदलताना तुम्हाला तुमचे पीएफ अकाऊंट नक्कीच ट्रान्सफर (Transfer) करावे लागेल.

जर तुम्ही सद्य स्थितीतील कंपनीकडे जमा असलेल्या पीएफ बॅलन्स (मागील कंपनीकडून पीएफ खाते ट्रान्सफर केल्यानंतर शिल्लक रकमेसह) काढल्यास तो करमुक्त समजला जाईल. मात्र तुम्ही जर एक नोकरी सोडली आणि दुसरी नोकरी करण्यापूर्वी त्यात काही काळ अंतर ठेवले आणि तुमच्या नोकरीचा कार्यकाळ सलग 5 वर्ष पूर्ण होत नसेल तर तुम्हाला पीएफमधून रक्कम काढताना टॅक्स भरवा लागेल.

हे वाचा-नोकरी गेली तरी नो टेन्शन! ESIC च्या या स्कीममधून मिळेल आर्थिक मदत, वाचा सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सर्व सेवा आता ऑनलाईन उपलब्ध असून, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याविषयी माहिती मिळवणे, त्यात जमा रक्कम काढणे सहज शक्य होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news