मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता PF खात्यांसाठी सरकारचा नवा नियम लागू , नोटिफिकेशन जारी; जाणून घ्या कसं मोजणार व्याज?

आता PF खात्यांसाठी सरकारचा नवा नियम लागू , नोटिफिकेशन जारी; जाणून घ्या कसं मोजणार व्याज?

पीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे.

पीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे.

पीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे.

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: केंद्र सरकारने नवे प्राप्तिकरविषयक नियम अधिसूचित (Notification of New Income Tax Rules) केले आहेत. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO Account) खात्यांना दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागलं जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Direct Taxes Board) अर्थात CBDT ने अधिसूचित केलेल्या प्राप्तिकर नियमांनुसार, आता प्रॉव्हिडंट फंडामध्ये (PF) एका ठरावीक मर्यादेबाहेर जमा झालेल्या व्याजावर इन्कम टॅक्स (Income Tax) आकारला जाणार आहे. ज्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या पीएफ अकाउंट्सना नवा नियम लागू करण्यासाठी दोन वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये त्यांची विभागणी केली जाणार आहे.

नव्या नियमांनुसार, नॉन टॅक्सेबल पीएफ काँट्रिब्युशनमध्ये (Non Taxable PF Contribution) या वर्षीच्या मार्च अखेरीपर्यंतचा बॅलन्स, तसंच संबंधित व्यक्तीकडून 2021-22 सह मागील आर्थिक वर्षांमध्ये करण्यात आलेल्या काँट्रिब्युशनचा समावेश असेल. टॅक्सेबल काँट्रिब्युशन अकाऊंटमध्ये (Taxable Contribution Account) समाविष्ट करण्यात न आलेल्या आणि मर्यादेपर्यंतच्या काँट्रिब्युशनचा यात समावेश आहे. मर्यादेबाहेरची रक्कम टॅक्सेबल काँट्रिब्युशन अकाउंटमध्ये जमा होईल आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल. हे नवे नियम एक एप्रिल 2022पासून लागू होतील.

मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील तीन वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75000 कोटींची करणार गुंतवणूक

 सरकारच्या अंदाजानुसार, जवळपास 1 लाख 23 हजार एवढे उच्च उत्पन्न गटातले नागरिक आपल्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये करमुक्त व्याजातून (Tax free Interest) 50 लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. या वर्षीच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Niramal Sitharaman) यांनी प्रॉव्हिडंट फंड काँट्रिब्युशनवर करमुक्त व्याजाची मर्यादा 2.5 लाख रुपये एवढी निश्चित करत असल्याची घोषणा केली होती. एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये एम्प्लॉयर (Employer Contribution) अर्थात त्याच्या कंपनीच्या काँट्रिब्युशनचा समावेश नसेल, तर त्यासाठीची मर्यादा पाच लाख रुपये असेल, असं सीतारामन यांनी सांगितलं होतं.

या पाच Mutual Fund मध्ये करा गुंतवणूक आणि मुलांच्या शिक्षण खर्चामधून व्हा Tension Free

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड (Employees Provident Fund) ही नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वांत लोकप्रिय असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये कंपनी आणि कर्मचारी या दोघांकडूनही मूळ वेतन आणि महागाई भत्ता (Basic Pay & Dearness Allowance) यांच्या 12 टक्के रक्कम दर महिन्याला EPF खात्यात जमा केली जाते. EPFO अर्थात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या संस्थेकडून यातल्या ठेवींचं व्यवस्थापन केलं जातं आणि त्यावर व्याज दिलं जातं. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार दर वर्षी व्याजदर निश्चित केला जातो.

First published:

Tags: Epfo news