मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO कडून PF खातेधारकांसाठी अलर्ट जारी! 'या' चुका टाळण्याचा दिला सल्ला

EPFO कडून PF खातेधारकांसाठी अलर्ट जारी! 'या' चुका टाळण्याचा दिला सल्ला

EPFO कधीही ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की आधार, पॅन, UAN, बँक खाते किंवा OTP फोनवर किंवा सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगत नाही. ऑनलाइन फसवणुकीपासून पीएफ पैशाचे संरक्षण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

EPFO कधीही ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की आधार, पॅन, UAN, बँक खाते किंवा OTP फोनवर किंवा सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगत नाही. ऑनलाइन फसवणुकीपासून पीएफ पैशाचे संरक्षण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

EPFO कधीही ग्राहकांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की आधार, पॅन, UAN, बँक खाते किंवा OTP फोनवर किंवा सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगत नाही. ऑनलाइन फसवणुकीपासून पीएफ पैशाचे संरक्षण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

    मुंबई, 21 फेब्रुवारी : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओनं (EPFO) आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds) संभाव्य धोक्याबद्दल अलर्ट जारी केला आहे. फसव्या योजना (Fraudulent Schemes) आणि घोटाळे करणाऱ्यांपासून (Scamsters) वापरकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच, भविष्य निर्वाह निधी खात्यांचं ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण करण्याचे काही उपायदेखील ईपीएफओनं शेअर केले आहेत. ईपीएफओनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये, आपल्या सदस्यांना वैयक्तीक माहिती शेअर करण्याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. एखाद्या व्यक्तीनं ती ईपीएफओ संस्थेची प्रतिनिधी असल्याचा दावा केला तरीही आपली माहिती देऊ नये, असं ईपीएफओनं सांगितलं आहे. ईपीएफओ कधीही आपल्या ग्राहकांना, आधार नंबर (Aadhaar Number), पॅन नंबर (PAN Number), यूएएन (UAN), बँक अकाउंट नंबर किंवा ओटीपी (OTP) फोन किंवा सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यास कधीही सांगत नाही.

    भविष्य निर्वाह निधी सदस्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांना सेवांसाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पैसे जमा करण्यास सांगत नाही. ईपीएफओ अधिकारी असल्याची बतावणी करून ग्राहकांचे वैयक्तिक तपशील शेअर करण्यास किंवा पैसे पाठवण्यास सांगणार्‍या कॉल आणि मेसेजेसला कधीही प्रतिसाद देऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे. याबाबत ईपीएफओनं एक ट्विट केलं आहे. "#EPFO कधीही आपल्या सदस्यांना वैयक्तिक तपशील जसं की आधार, पॅन, युएएन, बँक खाते किंवा OTP फोनवर किंवा सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगत नाही", असं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

    यूएएन, आधार किंवा पॅन क्रमांक शेअर करण्यासाठी किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला कॉल किंवा मेसेज येत असल्यास काय करावं?

    पगाराच्या कोणत्या भागावर आकारला जातो कर, कशात मिळते सूट!

    जर तुम्‍हाला ईपीएफओ अधिकारी असल्याचा दावा करणार्‍या प्रतिनिधींकडून युएएन डिटेल्स, पॅन किंवा आधार क्रमांक शेअर करण्‍यासाठी कॉल किंवा मेसेज येत असतील तर तत्काळ ईपीएफओला याची माहिती द्यावी. यासाठी तुम्ही www.epfindia.gov.in. या अधिकृत ईपीएफओ वेबसाईटची (EPFO Website) मदत घेऊ शकता. याशिवाय ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारेदेखील ईपीएफओशी कनेक्ट होऊ शकता.

    घोटाळेबाजांपासून तुमचं पॅन, आधार आणि इतर दस्तऐवज कसे सुरक्षित ठेवाल?

    ऑनलाइन स्कॅम्स टाळण्यासाठी, ईपीएफओ सदस्य DigiLocker सुविधेचा वापर करू शकतात. डिजीलॉकर हा कागदपत्रं आणि प्रमाणपत्रांचं स्टोरेज, शेअरिंग आणि व्हेरिफिकेशनसाठी एक सिक्युअर क्लाउडबेस्ड प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत (Digital India Programme) इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (MeitY) मंत्रालयाचा हा एक प्रमुख उपक्रम आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार नंबरसह डिजीलॉकरसाठी सहज साइन अप करू शकता. तुम्ही साइन अप केल्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर किंवा 12 अंकी आधार क्रमांक एक ओटीपी पाठवून ऑथेंटिकेट केला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी पिनचं टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-factor Authentication) करून घ्यावं लागेल. ‘अपलोड डॉक्युमेंट्स’ (Upload Documents) या ऑप्शनचा वापर करून तुम्ही डिजीलॉकरमध्ये ठेवू इच्छित असलेले डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता.

    डिजीलॉकरवर जास्तीत जास्त 10 एमबी फाइल अपलोड करण्याची परवानगी आहे. पीडीएफ, जेपीईजी आणि पीएनजी या विविध फॉरमॅटमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तुमचं डिजिलॉकर खातं आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी, तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी जोडलेला असणं आवश्यक आहे.

    EPFO नवीन पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत, लाखो कर्मचाऱ्यांना होईल फायदा

    ईपीएफओनं ट्विटमध्ये नमूद केलं आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये 16 लाखांहून अधिक ईपीएफओ सदस्यांनी ई-नॉमिनेशन दाखल केलं आहे. आजच ई-नॉमिनेशन दाखल करा आणि तुमचं कुटुंब किंवा नॉमिनीसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करा,' असं आवाहनही करण्यात आलं आहे.

    ईपीएफओनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन केल्यास तुम्ही फसवणुकीपासून स्वत:चं संरक्षण करू शकता.

    First published:

    Tags: Epfo news, Pf, Tax