नव्वदीपार पोहोचले पेट्रोल-डिझेलचे दर; करामध्ये तरी मोदी सरकार कपात करणार का?

Petrol

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कर सवलतीतून तरी दिलासा मिळतो का, याची प्रतीक्षा आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: सातत्याने इंधन आणि गॅसच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहे. या दरवाढीचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol - Diesel Price) सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे महागाई देखील वाढत आहे. परिणामी इंधन दरात कधी घट होणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. सरकार करामध्ये तरी कपात करणार का? याची प्रतीक्षा आहे. याबाबत सरकारनं राज्यसभेत उत्तर दिलं आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या करामध्ये (Tax) कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं राज्यसभेत स्पष्ट केलं आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान (Minister Dharmendra Pradhan) यांनी याबाबत माहिती दिली. बुधवारी त्यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना हे सांगितलं. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले,  पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात किंवा कर वाढवणे ही बाब सरकारची गरज आणि मार्केटमधील स्थिती आदी घटकांवर अवलंबून आहे. हे  वाचा -  लोकसभेत शेतकऱ्यांसाठी मोदींनी केला मोठा खुलासा: कृषी सुधारणा कायदे बंधनकारक नाहीत सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. राजस्थानमधील गंगानगर (Ganganagar) येथे बुधवारी पेट्रोलचे दर देशात सर्वाधिक म्हणजेच 98.10 रुपये प्रतिलीटर झाले तर डिझेलचे दर देखील देशात सर्वाधिक म्हणजेच 89.73 रुपये प्रतिलीटर होते. केंद्र सरकार वसूल करते एवढा कर राज्य सरकार व्हॅटच्या (VAT) माध्यमातून पेट्रोलवर 19.55 रुपये कर लावतात तर डिझेलवर 10.99 रुपये कर आकारला जातो. त्याव्यतरिक्त पेट्रोलवर डिलर कमीशन 2.6 रुपये प्रतिलीटर तर डिझेलवर 2 रुपये प्रतिलीटर असते. हे  वाचा - या शहरात पेट्रोलचे भाव जवळपास 100 रुपये प्रति लीटर, मुंबईत आहेत हे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम किरकोळ इंधनवर होतो. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड आईलचा दर 60 डॉलर प्रतिबॅरलपेक्षा अधिक होता. त्यामुळेच मागील तीन दिवसांनंतर डोमेस्टिक मार्केटमध्ये  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
Published by:Aditya Thube
First published: