Weekend ला डिझेलच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Weekend ला डिझेलच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

डिझेलच्या दरात 15 पैशांनी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै: एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच आता इंधनाचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी डिझेलच्या दरात 15 पैशांनी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. डिझेलचे दर 81.79 रुपये झाले आहेत. पेट्रोलचे दर साधारण 20 दिवसांपासून स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीत पेट्रोल 80.43 रुपये प्रतिलिटर तर डिझेलसाठी ग्राहकांना लिटरमागे 81.79 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 87.19 रुपये लिटर असून डिझेलसाठी 79.97 रुपये खर्च करावे लागत आहेत. तर कोलकाता इथे पेट्रोल 82.10 आणि डिझेल 76.91 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 83.63, डिझेलचा 78.73 रुपये प्रतिलिटर दर असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई आणि दिल्लीत डिझेल महाग झालं आहे.

हे वाचा-Lockdownच्या काळात भारतीयांची सर्वाधिक पसंत बिर्याणीला, नुडल्स-पिझ्झाही मागे

पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता.

देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 25, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या