• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काही दिवसांत किमती कमी होण्याची शक्यता

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काही दिवसांत किमती कमी होण्याची शक्यता

Petrol-Diesel Price Today: युरोपमध्ये कोविड प्रकरणे पुन्हा वाढली आहेत, याचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ शकतो. घरगुती इंधन विक्रेते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकतात.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol diesel rate) आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात (Fuel Rate Today) कोणताही बदल केलेला नाही आहे. गेल्या महिन्यात इंधन दराचा भडका उडाला होता, सातत्याने दर वाढत होते. या महिन्यात परिस्थिती वेगळी आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. कच्चे तेल स्वस्त होईल बेंचमार्क ब्रेंट क्रूड (Brent crude) शुक्रवारी 6.95 टक्क्यांनी घसरून 78.89 डॉलर प्रति बॅरल झाले, जे 10 दिवसांपूर्वी 84.78 डॉलर प्रति बॅरल होते. उतरणार इंधनाचे दर युरोपमध्ये कोविड प्रकरणे पुन्हा वाढली आहेत, याचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ शकतो. घरगुती इंधन विक्रेते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकतात. कोविड संसर्गामुळे गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या होत्या. पुन्हा एकदा कोविड संसर्गाच्या प्रसारामुळे तेलाच्या किमती कमी होत असल्याचे दिसत आहे. हे वाचा-BharatPe चे संस्थापक Paytm च्या विजय शेखर शर्मांवर बरसले सरकारी तेल कंपन्यांनी ऑटोमोबाईल इंधनावर नफा कमावला आहे, परंतु ग्राहकांना त्याचा फायदा देण्यापूर्वी त्यांनी जागतिक तेल बाजारातील घसरत्या ट्रेंडचा थोडक्यात अभ्यास केला. कारण आधी देखील जेव्हा कोविड संसर्ग शिखरावर होता, तेव्हा इंधनाच्या किमतीत घट झाली होती. सध्या इंधन दरात प्रतिलिटर 1 रुपयाची कपात होण्याची शक्यता आहे. काय आहेत इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 23rd November 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-Share market Update : शेअर बाजारात घसरणीचा कल; गुंतवणूकीसाठी चांगली संधी अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: