• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा तुमच्या शहरातील एक लीटर पेट्रोलचा भाव

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा तुमच्या शहरातील एक लीटर पेट्रोलचा भाव

पेट्रोल-डिझेल दरात 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : आज रविवारी IOCL ने पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel price today) नवे जर जारी केले आहेत. सलग 14व्या दिवशी किमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. पेट्रोल-डिझेल दरात 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी 15 पैशांची कपात केली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर आहेत. पेट्रोल-डिझेल GST मध्ये सामिल होणार नाही - वस्तू आणि सेवा कर अर्थात GST काउंसिलची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की 'पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही' पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 19 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर >> बेंगळुरूत पेट्रोल 104.70 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर >> लखनऊमध्ये पेट्रोल 98.30 रुपये आणि डिझेल 89.02 रुपये प्रति लीटर >> पटनामध्ये पेट्रोल 103.79 रुपये आणि डिझेल 94.55 रुपये प्रति लीटर

    सामान्यांना दिलासा नाहीच! आणखी वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर, हे आहे कारण

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    पेट्रोल-डिजेलच्या किमतीत दिलासा नाहीच; अर्थमंत्र्यांचा घोषणेनंतर देशभरात नाराजी

    IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.
    Published by:Karishma
    First published: