Home /News /money /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा आजचा लेटेस्ट रेट

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, इथे तपासा आजचा लेटेस्ट रेट

5 सप्टेंबर रोजी इंधन दरात बदल झाले होते. त्यानंतर ते स्थिर आहेत.

    नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : आज पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) दरात वाढ झालेली नाही. सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. 5 सप्टेंबर रोजी इंधन दरात बदल झाले होते. त्यानंतर ते स्थिर आहेत. 5 सप्टेंबरला किंमतीत 15 पैसे प्रति लीटर कपात झाली होती. IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा भाव 101.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.62 रुपये प्रति लीटर आहे. IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात. पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 12 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर

    Indian Railways: IRCTC बदलणार तिकीट बुकिंगची प्रक्रिया, असा होणार फायदा

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या