मुंबई, 22 नोव्हेंबर : घरातून बाहेर पडण्याआधी पेट्रोल डिझेलचे दर (Petril-diesel Price ) पाहिलेलं बरं. कारण नियमित वाढणारे इंधनाचे दर आज किती आहेत याची माहिती असेल खर्चाचा अंदाज येतो. सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) सोमवारी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही दरात वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर या महिन्यातही दर स्थिर आहेत.
आज मुंबई पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेपासून इंधनाचे दर जवळपास स्थिर आहेत. उत्तर प्रदेशसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा कमी दराने मिळत आहे.
राज्यांनीही किमती कमी केल्या
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केल्यामुळे ही कपात झाली आहे. यासोबतच अनेक राज्यांतील राज्य सरकारांनीही आपापल्या पातळीवर किमती कमी केल्या आहेत. यूपीमध्ये पेट्रोल डिझेल 12-12 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
सायकल चोरून पळाला चोर; मालकाने अशी घडवली अद्दल, CCTV मध्ये कैद झाली घटना, VIDEO
22 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर
>> दिल्ली - पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
>> मुंबई - पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
>> चेन्नई - पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
>> कोलकाता - पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
>> श्रीगंगानगर - पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर
हिवसाळाच की! मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला नवीन इशारा
पेट्रोल-डिझेलची सकाळी 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.