• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोल-डिझेल नवे दर जारी, पाहा मुंबईतील आजचा लेटेस्ट रेट

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेल नवे दर जारी, पाहा मुंबईतील आजचा लेटेस्ट रेट

Petrol-Diesel Price Today

Petrol-Diesel Price Today

पेट्रोल-डिझेल दरात (Petrol-diesel price today) आज कोणतेही बदल झालेले नाहीत. IOCL वेबसाइटनुसार, आज शनिवारी देशभरात इंधन दर स्थिर आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेल दरात (Petrol-diesel price today) आज कोणतेही बदल झालेले नाहीत. IOCL वेबसाइटनुसार, आज शनिवारी देशभरात इंधन दर स्थिर आहे. यापूर्वी शुक्रवारी डिझेलच्या दरात 22 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढ झाली होती. तर पेट्रोल दर स्थिर ठेवण्यात आले होते. पेट्रोल किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. या वाढीसह आज राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.19 रुपये आणि डिझेलचा भाव 88.82 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं, की देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत नाहीत, कारण राज्य इंधन GST कक्षेत आणू इच्छित नाहीत. वस्तू आणि सेवा कर अर्थात GST काउंसिलची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की 'पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही'

    तुमचं Aadhaar-Pan कार्ड लिंक आहे का? नसेल तर मिनिटांत असं करा लिंक

    चार महानगरात पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 25 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.82 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.41 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.46 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.62 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    आधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली? अशी मिळेल नुकसान भरपाई

    IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.
    Published by:Karishma
    First published: