मराठी बातम्या /बातम्या /मनी /

देशात पहिल्यांदा 120 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं पेट्रोल, या शहरांत विकलं जातंय सर्वात महाग इंधन; तपासा यादी

देशात पहिल्यांदा 120 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं पेट्रोल, या शहरांत विकलं जातंय सर्वात महाग इंधन; तपासा यादी

Fuel Price Today: देशातील अनेक शहरात 120 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत.

Fuel Price Today: देशातील अनेक शहरात 120 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत.

Fuel Price Today: देशातील अनेक शहरात 120 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी देशभरात उच्चांक गाठला (Petrol Diesel Price at Highest Level) आहे. देशभरात वाढलेल्या इंधन दराने सामान्यांना रडवले आहे. दरम्यान आजही पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) वाढले आहेत. पण आजच्या वाढीने नवा रेकॉर्ड सेट केला आहे. देशातील अनेक शहरात 120 रुपये प्रति लीटरपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत. पुढील शहरात आहेत 120 रुपये प्रति लीटरच्या आसपास पेट्रोलचे दर >> राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पहिल्यांदा पेट्रोल 119.05 रुपये आणि डिझेल 109.88 प्रति लीटरवर पोहोचले आहे >> मध्य प्रदेशातील अनुपपूरमध्ये पेट्रोलची किंमत 118.35 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर डिझेल 107.50 रुपये आहे. >> सतनामध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 120 रुपयांच्या पुढे गेली आहे आणि डिझेल देखील 105.67 प्रति लीटरने विकले जात आहे. > अलीराजपूरमध्ये सुपर पेट्रोल 120 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 105.51 रुपये प्रति लीटरने विकले जाते. >> मध्यप्रदेशातील रीवा याठिकाणि पेट्रोल 117.95 रुपये प्रति लीटर, डिझेल 107.14 रुपये आहे. वाचा-Gold Rate: रोज वाढतायंत सोन्याचांदीचे दर, तरीही 8600 रुपयांनी स्वस्त आहे सोनं चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर >> दिल्ली पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल 95.62 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 112.78 रुपये आणि डिझेल 103.63 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 103.92 रुपये आणि डिझेल 99.92 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 107.44 रुपये आणि डिझेल 98.73 रुपये प्रति लीटर वाचा-PNB ग्राहकांना या स्कीममधून मिळेल 15 लाखांचा फायदा, वाचा काय आहे योजना? अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise

पुढील बातम्या