Home /News /money /

Diesel-Petrol Price Today: मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव जवळपास 93 रुपये, तर याठिकाणी 101 रुपये आहे किंमत

Diesel-Petrol Price Today: मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव जवळपास 93 रुपये, तर याठिकाणी 101 रुपये आहे किंमत

Diesel-Petrol Price, 29th january 2021: भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. इथे तपास तुमच्या शहरात किती दराने विकले जात आहे इंधन

    नवी दिल्ली, 29 जानेवारी: भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये (Diesel Petrol Price Today) कोणताही बदल केला नाही आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 86.30 रुपये प्रति लीटर आहेत. दरम्यान मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याठिकाणी दर जवळपास 93 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहेत. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर याठिकाणी पेट्रोलचे दर 101 रुपये प्रति लीटर झाले आहेत. गेल्या 27 दिवसापैकी एकूण 10 दिवसच इंधनाचे दर वाढले आहेत. मात्र या दिवसात पेट्रोल एकूण 2.59 रुपये प्रति लीटरने महागले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 02.35 रुपये प्रति लीटरची वाढ झाली आहे. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. (हे वाचा-PM-Kisan योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर!'इतक्या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ) महानगरांमधील पेट्रोलचे दर -दिल्ली: पेट्रोल 86.35 रुपये आणि डिझेल 76.48 रुपये प्रति लीटर -मुंबई: पेट्रोल 92.86 रुपये आणि डिझेल 83.30 रुपये प्रति लीटर -कोलकाता: पेट्रोल 87.69 रुपये आणि डिझेल 80.08 रुपये प्रति लीटर -चेन्नई:  पेट्रोल 88.82 रुपये आणि डिझेल 81.71 रुपये प्रति लीटर (हे वाचा-फेब्रुवारीमध्ये या दिवशी राहणार बँका बंद, कामाचा खोळंबा टाळण्यासाठी तपासा यादी) -नोएडा: पेट्रोल 85.67 रुपये आणि डिझेल 76.93 रुपये प्रति लीटर -रांची: पेट्रोल 84.80 रुपये आणि डिझेल 80.91 रुपये प्रति लीटर -बंगळुरू: पेट्रोल 89.21 रुपये आणि डिझेल 81.10 रुपये प्रति लीटर -पाटणा: पेट्रोल 88.78 रुपये आणि डिझेल 81.65 रुपये प्रति लीटर -लखनऊ: पेट्रोल 85.59 रुपये आणि डिझेल 76.85 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. (हे वाचा-Budget 2021: आज सादर केला जाईल इकॉनॉमिक सर्व्हे,वाचा अर्थसंकल्पाशी काय आहे संबंध) BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Mumbai, Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise

    पुढील बातम्या