नवी दिल्ली, 5 एप्रिल : येत्या काही दिवसांत महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Hike) सातत्याने वाढत आहेत. आज संसदेत या विषयावर सरकारला प्रश्न विचारला असता, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उत्तर देताना त्याची तुलना अमेरिका आणि ब्रिटनमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींशी केली आहे.
भारतात केवळ 5% किंमत वाढली
हरदीप सिंग पुरी म्हणाले, 'माझ्या मते, गेल्या दोन आठवड्यात भारतात पेट्रोलच्या किमतीत 5% वाढ झाली आहे. त्यांच्या किमतीत वाढ केवळ भारतातच झालेली नाही. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत अमेरिकेत 51%, कॅनडामध्ये 52%, जर्मनीत 55%, ब्रिटनमध्ये 55%, फ्रान्समध्ये 50% आणि स्पेनमध्ये 58% पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत.'' आज लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पुरी यांनी सांगितले.
9.20 रु. ने वाढ
गेल्या दोन आठवड्यांत तेल कंपन्यांनी हळूहळू पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ केली आहे. सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोजच वाढ करून सर्वसामान्यांना झटका देत आहेत. गेल्या 2 आठवड्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9 रुपये 20 पैशांनी वाढ झाली आहे. दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 13 वेळा वाढ झाली आहे.
गाडी पेक्षा टोल महाग! ड्राव्हरच्या खात्यातून कापला 43 लाखांचा टोल; चूक मान्य पण कंपनीचा पैसे देण्यासही नकार
22 मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची प्रक्रिया आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. गेल्या पंधरवड्यात 24 मार्च आणि 1 एप्रिल असे दोनच दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, इतर सर्व दिवसांत किंमती वाढल्या आहेत. अशाप्रकारे दिल्लीत पेट्रोल 9.20 रुपयांनी महागले आहे.
दिल्लीत 104 रुपये लिटर पेट्रोल
मंगळवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, आता राष्ट्रीय राजधानीत पेट्रोल 104.61 रुपये प्रति लिटर तर डिझेल 95.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्याचवेळी मुंबईत आता पेट्रोल 119.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.